बुलढाणा आय. एम. ए. मध्ये धुसफूस : न्यायालयाच्या आदेशाने नवीन कार्यकारिणी
आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ. अजीत शिरसाट यांनी गुड इव्हिनिंग सिटीला सांगितले की, नवीन कार्यकारिणी ही केवळ 38 जणांमधून निवडलेली आहे. दरवर्षी चॅरिटी कमिश्नरला चेंज रिपोर्ट करावा लागतो, तो कित्येक वर्षांपासून करण्यात आलेला नाही. सध्याच्या कार्यकारिणी आम्हाला मान्य नाही. आम्ही पुढील दोन महिन्यात पुन्हा निवडणूका घेवू, त्यात सर्व 182 सदस्य असतील, या शब्दांत डॉ. अजीत शिरसाट यांनी गुड इव्हिनिंग सिटीला आपली प्रतिक्रिया दिली आहे. तर यावर आयएमएचे प्रदेश प्रतिनिधी डॉ. जे.बी. राजपूत म्हणाले की, डॉ. शिरसाट यांनी त्यांची बाजू कोर्टासमोर मांडायला हवी होती. परंतु ते एकदाही हजर राहिले नाही. आम्ही कायदेशीर लढाई लढलो म्हणून जिंकलो. नवीन कार्यकारिणी नव्या उर्जेसह काम करण्यासाठी तयार असल्याचा विश्वास डॉ. राजपूत यांनी व्यक्त केला. आय. एम. ए. बुलढाणा शाखेची नविन कार्यकारणीची निवडणुक संपन्न. अध्यक्षपदी डॉ. के.बी. शर्मा तथा सचिव पदी डॉ. जी. वाय. व्यवहारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 22 डिसेंबर रोजी आय.एम.ए. हॉल येथे सहायक धर्मादाय आयुक्त यांचे न्यायालयाचे आदेशानुसार दिनांक 25 डिसेंबर रोजी निवडणुक संपन्न झाली. मागील दिड वर्षापासुन आए.एम.ए. ला कायदेशीर कार्यकारणी नव्हती. कायदेशीर कार्यकारणी ची निवडणुक घ्यावी म्हणून डॉ.जे.बी. राजपूत व डॉ. पंजाब हिरे यांनी सहायक धर्मादाय आयुक्त बुलढाणा यांचे न्यायालयात निवडणुक घेण्यासंबधी अंडर सेक्शन 41ए नुसार अर्ज केलेला होता. न्यायालयाने हा अर्ज मंजूर करुन निवडणुक घेण्याचे आदेश दिले. वरील आदेशानुसार खालील कार्यकारणीची निवड एक वर्षासाठी बिनविरोध करण्यात आली. यामध्ये अध्यक्ष म्हणून डॉ. के.बी. शर्मा, उपाध्यक्ष म्हणून डॉ. सौ. सुरेखा राजुसकर, मानद सचिव म्हणून डॉ. जी. वाय. व्यवहारे, सहसचिव म्हणून डॉ. जे.बी. राजपूत, कोषाध्यक्ष म्हणून डॉ. पंजाब हिरे, कार्यकारणी सदस्य म्हणून डॉ. सुरेश छाजेड, डॉ. सौ. प्रिती बेदमुथा, डॉ. राजिव भागवत, डॉ. राजेंद्र बेदमुथा, केद्रिय प्रतिनिधी म्हणून डॉ. विनायक उबरहंडे, तर राज्यप्रनिधी म्हणून डॉ. विनोद कुमार उकार्ड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणुक अधिकारी म्हणून डॉ. पी.एम. गुप्ता व डॉ. एस. एस. राजपूत यांनी काम पाहिले नविन कार्यकारणीचे मावळते अध्यक्ष डॉ. छाजेड व मावळते सचिव डॉ. उबरहंडे यांनी तसेच आए.एम.ए. च्या सर्व आजिव सदस्याचे, बिनविरोध निवड केली म्हणून आभार मानले.