-
आर.ओ. वॉटर, प्लबींग, ईलेक्ट्रीकल्स विक्रेत्यांची लाखोंनी फसवणूक
बुलढाणा, 26 डिसेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) :- ऑनलाईन फसवणूकीपासून जसे नागरिक हुशार होत आहे, तसे सायबर क्रीमीनलसुद्धा नव्या नव्या क्लृप्त्या लढवून भामटेगिरीच्या पद्धतींमध्ये बदल करीत आहेत. एखादे निश्चीत स्थळ सांगून त्याठिकाणी माल पोहोचविण्याचे म्हटले तर कुणाचा विश्वास बसणार नाही. खामगांवच्या एनसीसी बटालियनच्या ऑफिसमध्ये साहित्य पाठविण्याचे सांगून एका भामट्याने खामगांवच्या काही व्यावसायिकांना लाखो रूपयांनी गंडविल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात बुलढाणा सायबर पोलिस स्टेशनमध्ये यासंदर्भात तक्रार नोंदविण्यात आली आहे. खामगांवमध्ये एनसीसी 13 बटालियनचे केंद्र सरकारच्या अखत्यारितील कार्यालय आहे. आर्मीशी संबंधीत हे कार्यालय जी.एस. कॉलेजपरिसरात आहे. भामट्यांनी या कार्यालयाचा आधार घेत काही जणांची आनलाईन फसवणूक केली आहे. ‘मैं खामगांव ऑफिससे आर्मी ऑफिसर मुकेश बात कर रहा हूं’, असा 7002948138 या क्रमांकावरून खामगांवमधील एका आरओ वॉटर सप्लायर्सला कॉल आला. त्याला एका महिन्यासाठी आरओ वॉटर पुरवठा करण्याची ऑर्डर देण्याचे सदर भामट्याने सांगितले. एका महिन्यासाठी आम्ही 50 लोक याठिकाणी आलेलो आहोत. त्ुाम्ही बिल पाठवा मी ॲडव्हान्समध्ये पेमेंट करतो. नंतर संबंधित सप्लायर्सने व्हॉट्सॲपवर बिल पाठविले.
आपके अकाऊंटपर पैसे नहीं जा रहे.. असे म्हणून त्याने ऑनलाईन अकाऊंट मागितले. त्यात 32 हजार बिलाची रक्कमऐवजी 86 हजार रुपये टाकल्याचा फेक मॅसेज पाठविला. संबंधीत आर.ओ. वॉटर सप्लायर्सला नंतर या भामट्या मुकेशने म्हटले की, त्याच्याकडून चुकीने जास्तीचे पैसे अकाऊंटला ट्रान्सफर झालेत. त्यामुळे उर्वरीत पैसे परत करा. आपली फसवणूक होत असल्याबाबत संबंधीत सप्लायर अनभिज्ञ होता. त्याने पैसे परत पाठविले. त्याने पुन्हा दूसरा फेक मॅसेज पाठविला. पुन्हा पैसे परत करण्याचे सांगितले. असे करत करत खामगांवच्या या आरओ वॉटर व्यावसायिकाचे 1 लाख 28 हजार रुपये त्या भामट्याकडे जमा झाले. आपली फसवणूक होत आहे, हे जेव्हा व्यावसायिकाच्या लक्षात आले, त्ोव्हा वेळ निघून गेली होती. याबाबत जेव्हा व्यावसायिकाने एनसीसी ऑफिसमध्ये चौकशी केली, त्ोव्हा आपण फसविल्या गेल्याचे त्याच्या लक्षात आले होत्ो. असा कुठलाही ऑफिसर खामगांवमध्ये नाही. संबंधित फसवणूकीची तक्रार सायबर पोलिसांत करण्यात आली आहे. व्यावसायिकाची फसवणूक केलेली रक्कम कर्नाटक आणि मुंबईमधील अकाऊंटमध्ये गेली आहे. ऑनलाईन फसवणूक करणारा हा भामटा आर्मी ऑफिसर आसामच्या नंबरवरून बोलत होता. खामगांवमध्ये मागील आज सकाळी एका इन्हर्वटरवाल्याची अशीच फसवणूक होत होती. परंत्ुा त्याच्या लक्षात आल्याने भामट्या आर्मी ऑफिसरचा डाव उधळला गेला. एका प्लम्बींग दूकानदाराला मात्र याने एनसीसी ऑफिस खामगांवच्या नावाने फसविले आहे.