बुलढाणा, 20 फेब्रुवारी (गुड इव्हिनिंग सिटी) : समृध्दी महामार्गावर भीषण अपघताची घटना आज घडली आहे. भरधाव गाडीने साईड बॅरिकेट्स तोडून गाडी बॅरिकेट्समध्ये घुसली आहे. गाडी व गाडीमध्ये असलेले तिघे जण जळाले असून दोन जणांचा अक्षरशः कोळसा झाला आहे. तर गाडीचा चालक गंभीर भाजला असून त्याला जालना येथील हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. गुड इव्हिनिंग सिटीला मिळालेल्या माहितीनुसार सदर गाडी हे ठाणे येथून अकोल्याकडे जात होती.
पोलीस स्टेशन किनगाव राजा अंतर्गत समृद्धी हायवे चॅनेल क्रमांक 318.8 नागपूर लेनवर आज दिनांक 20फेब्रुवारीरोजी सकाळी 9 वाजताच्या सुमारास भरधाव गाडी क्रमांक एम एच 04 एलबी 3109 रोडचे साईड बॅरिकेट्स तोडून अपघात झाला आहे. या कार मध्ये दोन मृतदेह पूर्णतः जळालेल्या आहेत यामध्ये पुरुष किंवा स्त्री असल्याचे आधी चर्चा होती. परंतु कोळसा झालेले दोन्ही मृतदेह पुरुषाचे असल्याचे ठाणेदार श्री नरवाडे यांनी गुड इव्हिनिंग सिटीला सांगितले आहे. त्याचप्रमाणे कार देखील पूर्णतः जळालेली आहे. सदर जळालेल्या गाडीचा फोटो आम्ही आमच्या वृत्तामध्ये दिला आहे. घटनास्थळावर समृद्धी फायर ब्रिगेड स्टाफ अॅम्बुलन्स हजर आहे. किनगाव राजा पोलिसांनी दोन्ही मृतदेह गाडीमधून बाहेर काढले आहे. पोलिसांनी गाडी बाजूला करून वाहतूक सुरळीत केली आहे. सदर मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलिस प्रयत्न करीत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करीत आहे.