spot_img

एकनाथ शिंदेंना उडविण्याची धमकी देणारे बुलढाण्याचे!!

◾ मुंबई पोलिसांकडून देऊळगाव मही येथील दोघांना अटक

बुलढाणा, 21 फेब्रुवारी (गुड इव्हिनिंग सिटी) : उमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वाहन उडवून देण्याच्या धमकीचे ई मेल पोलिस स्टेशन आणि मंत्रालयात पाठविल्या प्रकरणी बुलढाणा जिल्हयातील दोघांना मुंबई गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. यामध्ये देऊळगाव मही येथील अभय गजानन शिंगणे, मंगेश अच्युतराव वायाळ यांचा समावेश आहे. त्या दोघांवर गोरेगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय वाहन बॉम्बने उडवून दिले जाईल, अशी धमकी गुरुवारी शहरातील काही पोलीस ठाणी आणि मंत्रालयात ई-मेलद्वारे प्राप्त झाली. याप्रकरणी गुन्हे शाखेने दोन तरूणांना ताब्यात घेतले आहे दोघेही बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव मही येथील रहिवासी आहे. त्यांना मुंबई आणण्यात येत आहे. 
शिवसेनेचे पक्ष प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठार मारण्याची धमकी काल देण्यात आली. एकनाथ शिंदे यांची गाडी बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. गोरेगाव पोलीस ठाण्यात हा धमकीचा ई-मेल आला आहे. पोलिसांनी ई-मेल पाठणार्‍यांचा शोध सुरू केला. मुंबईतील इतर पोलीस ठाण्यांमध्येही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याच्या धमकीचा मेल आला होता. ई-मेलमध्ये एकनाथ शिंदे यांची मोटार बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. गोरेगाव पोलीस ठाण्याला शिंदे यांचे शासकीय वाहन उडवून देण्याबाबत धमकीचा ई-मेल प्राप्त झाला होता. याप्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 351(3), 351(4) व 353(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत