बुलढाणा, 14 मे, (गुड इव्हिनिंग सिटी) ः लग्नाच्या वरातीत हातात तलवार घेवून गाण्याच्या तालावर आ.खरात थिरकल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिध्दार्थ खरात एका लग्नाच्या वरातीत थिरकल्याचा व्हिडिओ गुड इव्हिनिंग सिटीकडे आहे. वास्तविक आमदार सिध्दार्थ खरात हे आधी प्रशासकीय सेवेत होते. त्यामुळे त्यांना कायद्याचे ज्ञान अवगत आहे. ते सध्या लोकप्रतिनिधी असल्यामुळे लोकप्रतिनिधीने अशाप्रकारे वर्तन करणे हे चुकीचे आहे. महाराष्ट्रात या आधी लग्नाच्या वरातीत तलवार घेवून नाचल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले आहे. त्यामुळे आमदार सिध्दार्थ खरात यांच्यावर सुध्दा प्रशासन काही कारवाई करते का हे बघावे लागेल. कारण या आधी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी त्यांच्या मुलाच्या वाढदिवसाला तलवारीने केक कापल्यामुळे गुन्हा दाखल झाला होता.