spot_img

दिव्यांग व जेष्ठ नागरीकांना मोफत साहित्य वाटपाकरीता उद्या बुलढाण्यात शिबीर

बुलढाणा,  १८ मे (गुड इव्हिनिंग सिटी) : तालुक्यातील दिव्यांग व्यक्ती व ६० वर्षावरील जेष्ठ नागरीक यांचेकरीता कृत्रिम अवयव व आवश्यक ती साधने पुरविणेकरीता सोमवार, दिनांक १९ मे  रोजी सकाळी ९ ते ५ या वेळेत अंध, अपंग व मुकबधिर निवासी विद्यालय अजिंठा रोड बुलडाणा येथे साहित्य वाटपाकरीता तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सदर योजनेचा जास्तीत जास्त दिव्यांग व्यक्ती व जेष्ठ नागरीक यांनी लाभघ्यावा असे जिल्हा प्रशासन व अपंग कल्याण व पुनर्वसन संस्था बुलडाणा यांचे वतीने करण्यात येत आहे.
आवश्यक ती कागदपत्रे खालील प्रमाणे सोबत घेवून यावे.
i) दिव्यांग व्यक्तींसाठी
 १) UDID कार्ड २) आधार कार्ड ३) अपंगत्व दर्शविणारा फोटो ४) उत्पन्नाचा दाखला (मासिक उत्पन्न २२५००/- पेक्षा जास्त नसावे तलाठी, सरपंच, ग्रामसेवक, BPL रेशन कार्ड) ५) दृष्टीहिन लाभार्थ्यांबाबतीत शैक्षणिक शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड
ii) जेष्ठ नागरीकांसाठी
१) आधार कार्ड २) फोटो ४) उत्पन्नाचा दाखला (मासिक उत्पन्न १५०००/-पेक्षा जास्त नसावे – तलाठी, सरपंच, ग्रामसेवक, BPL रेशन कार्ड)
https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत