spot_img

बुलढाण्याच्या अपर पोलीस अधीक्षक पदी अमोल गायकवाड

बुलढाणा, ८ जुलै (गुड इव्हिनिंग सिटी) : बुलढाण्याच्या अपर पोलीस अधीक्षक पदी अमोल गायकवाड यांची नियुक्ती झाली आहे. अपर पोलीस अधीक्षक बी बी महामुनी यांची रत्नागिरी येथे बदली झाल्यानंतर बुलढाणा अपर पोलीस अधीक्षक पद रिक्त होते. त्या जागी अमोल गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अमोल गायकवाड यांनी देऊळगाव राजा उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून सुद्धा जिल्ह्यात कार्यरत होते. महाराष्ट्र पोलिस दलात मोठी खांदेपालट झाली आहे महाराष्ट्र पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. पोलिस उपआयुक्त दर्जाच्या राज्यातील २२ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. पुणे, मुंबईसह इतर जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीआधी पोलीस दलात मोठे फेरबदल पाहायला मिळत आहे.

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत