spot_img

“राजे मंगलकार्यालय” बेकायदेशीर…?

शिवसेनेकडून कारवाईची मागणी

बुलढाणा, 9 जुलै (गुड इव्हिनिंग सिटी) : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लागण्यापूर्वीच बुलढाण्यातील राजकीय वातावरण चांगेलच तापल्याचे दिसून येत आहे. नगर पालिका बुलढाणा हद्दीतील विष्णुवाडी येथील राजे मंगल कार्यालयाचे बेकायदेशिर गुंठ्ठेवारी पध्दतीने नियमबाह्य बांधकाम केल्याप्रकरणी कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. शिवसेनेच्या वतीने बुलढाणा नगर पालिकेचे मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, विष्णूवाडी बुलढाणा येथील सुविधाक्षेत्र म्हणून विकास योजनेवरीती दर्शवीलेली आहे. ही जागा तत्कालीन जागेच्या मालकाला नगरपरिषदेच्या ताब्यात देण्यात यावी म्हणून नोटीस देण्यात आली होती. सुविधाक्षेत्रावर (खुला भुखंड) नगर पालिका मुख्याधिकारी यांनी बोगस गुंठ्ठेवारी केलेली असून गुंठ्ठेवारी हा कायदा निवासी क्षेत्राकरीता लागू असतो परंतु व्यावसायिक करीता हा कायदा लागु होत नाही, तरी सुध्दा मुख्याधिकारी यांनी सर्व नियम धाब्यावर ठेवून नियमबाह्य गुंठ्ठेवारी केली आहे. मालकाने सदर जागा नगर पालिकेच्या ताब्यात दिलेली नसुन तत्कालीन मुख्याधिकारी यांनी नियमबाह्य गुंठ्ठेवारी आदेश पारित करून नियमबाह्य बांधकाम परवानगी देण्यात आलेली आहे. असे असूनसुध्दा मागील जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी यांनी गुंठेवारी व बांधकाम परवानगी आदेश रद्द केलेला आहे.
राजे मंगल कार्यालय हे बेकायदेशीर असुन त्यावर तात्काळ कार्यवाही करून सुविधाक्षेत्र (खुला भुखंड) तेथील नागरीकांसाठी खुला करून देण्यात यावा अन्यथा बुलढाणा शहर शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोनल छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनावर बुलढाणा शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, शिवसेना शहरप्रमुख गजेंद्र दांदडे, श्रीकांत गायकवाड, श्रीकृष्ण शिंदे, ज्ञानेश्‍वर खांडवे, बंडू आसबे, विठ्ठलराव येवले, जिवन उबरहंडे, विजय कोल्हे, संजय हाडे, अरूण ढोरे, मोहन पर्‍हाड व इतरांच्या सह्या आहेत. राजे मंगलकार्यालय माजी आमदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्या मालकीचे असल्याचे समजते. त्यामुळे नगर पालिका मुख्याधिकारी यावर काय कारवाई करतात याकडे अनेकांच्या नजरा लागल्यात हे मात्र निश्‍चित.

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत