बुलढाणा, 27 जुलै (गुड इव्हिनिंग सिटी) ः नाटक, मालिका आणि चित्रपट अशा वेगवेगळ्या माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडणार्या ज्येष्ठ अभिनेत्री ‘पद्मश्री’ नयना आपटे सध्या बुलढाणा जिल्हा दौर्यावर आहेत. 76 वर्षीय नयना आपटे यांनी मराठी-हिंदी भाषा वादात आपली भूमिका ठणकावून मांडली आहे. त्यांनी सवाल केला की, महाराष्ट्रात कशाला पाहीजे हिंदी ?.. मराठी महाराष्ट्राची भाषा आहे.. साऊथवाले त्यांची भाषा सोडत नाही तशी मराठी आपल्यासाठी सर्वार्थागगगगणि मुलांनी नाट्यक्षेत्राकडे वळावे यासाठी मागील 25 वर्षांपासून त्या नाट्यचळवळ राबवित आहेत. शहरांमध्ये नाट्यगृहे नाहीत, अनेक वर्षांपासून नाटकांचे प्रयोग झालेले नाहीत, त्यामुळे येणार्या पिढीला नाटक म्हणजे काय, कळायला मार्ग नाही. म्हणून लहानपणापासूनच या मुलांना नाटकाचे बाळकडू मिळण्याच्या उद्देश्यातून विविध शहरांमध्ये जावून तिथल्या मुलांना नाटकांमध्ये सहभागी करून घेत आहोत. त्यातून मुलांमध्ये नाटकाविषयी आवड निर्माण होत आहे. शंभर पैकी दोन मुले जरी नाट्यअभिनयाकडे वळले तरी आम्ही यशस्वी झालो आणि निश्चीतच सर्वत्र मिळणारा प्रतिसाद पाहता आम्ही आनंदी असल्याचे नयना आपटे म्हणाल्या.
76 वर्षीय नयना आपटेंनी नाट्यक्षेत्राला घेवून अनेक गोष्टी सांगितल्या. जे विद्यार्थी नाटकासाठी निवडले जात आहेत, त्यातील अनेकांना नीट बोलता येत नाही, वाचता येत नाही.. अनुस्वार कळत नाही.. मग विद्यार्थ्यासाठी आम्ही संपूर्ण नाटक रेकॉर्डिंग केलं… दर कोसावर भाषा बदलते.. पण ही भाषा रंगभूमिवर वापरली जावू शकत नाही.. मग नाटकाची प्रमाणभाषा त्याला शिकावी लागेल.. नाटक जीवनाचा घटक आहे.. जो नाटक शिकेल, तो हमखास यशस्वी होईल’, हा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आज, 27 जुलै रोजी बुलढाण्यात लेखक, दिग्दर्शक प्रवीण भारदे यांच्या दोन नाटकांचे प्रयोग होते. गुलाबी साडीतील चेटकीण आणि मला आई-बाबा हवेत या नाटकांमध्ये नयना आपटे यांची मध्यवर्ती भूमिका आहे. विशेष म्हणजे या नाटकांमध्ये बुलढाण्यातील काही बालकलाकारांनीही अभियन केला. हे बालकलाकार विविध शाळांमध्ये जावून नयना आपटे आणि सहकार्यांनी निवडले होते.