बुलढाणा, 12 ऑगस्ट (गुड इव्हिनिंग सिटी) ः जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या भिंगारा, चाळीसटापरी व गोमाळ या भागात आदिवासींसाठी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेलं काम सर्वश्रुत आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत यशोवर्धन सपकाळ यांनी आज जिल्हा परिषदेच्या सीईओंच्या कॅबिनसमोर आदिवासी बांधवांनासोबत घेत ठिय्या आंदोलन केले. यावेळी लेखी आश्वासन दिल्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी गुलबाराव खरात यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे की, भिंगारा, चाळीस टापरी गोमाळ येथील शैक्षणिक प्रलंबीत मागण्या पुर्ण करण्यात याव्यात. भिंगारा येथे मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी संख्या असतांना मात्र शैक्षणिकदृष्ट्या शिक्षक संख्या कमी असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. इयत्ता 9 व 10 साठी तातडीने शिक्षकांची नेमणूक करत असतांना मुलीची संख्या लक्षात घेता एकही महिला शिक्षिका नसल्याने त्यांची शैक्षणिक कुचंबना होत आहे. चाळीस टापरी येथे शाळा व अंगणवाडी बांधकाम करण्यात यावे. यापूर्वी अनेक वेळा दिलेल्या तक्रार, विनंती अर्ज, निवेदन आपणास दिलेल्या आहे मात्र अद्यापपर्यंत आमच्या मागण्यांवर ठोस कार्यवाही झालेली नाही. अनेक वर्षापासून आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी बाबत प्रशासनाच्या लक्षात आणून देण्यात आल्या असतांना सुध्दा प्रशासन डोळेझाक करत असल्याचे लक्षात येते त्यामुळे या भागातील मुलांच्या शैक्षणिक स्तर उंचविण्याच्या दृष्टीने तथा आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता त्या ठिकाणी तातडीने प्रलंबीत मागण्या पूर्ण करण्यात याव्यात यासोबतच चाळीसटापरी येथे शाळा बांधकाम पुनर्रमान्यता असून अनेक वर्षापासून त्याबाबतच्या तांत्रीक मान्यता असतांना सुध्दा संबंधीत ठेकेदाराने शाळा बांधकाम केलेले नाही. ते त्वरीत पुर्ण करण्यात यावे. गोमाळ येथील सध्या कार्यरत शिक्षक कर्तव्यावर असतांना मद्यपान करत असल्याचे सुध्दा निदर्शनास आले असून हे असह्य आहे. तेव्हा संबंधीत शिक्षकास तातडीने बडतर्फ करण्यात यावे अशा मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे.
मुख्यकार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी कॅबिन समोर येवून आदिवासी बांधवांच्या समस्या ऐकूण घेतल्या व त्यामधील ज्या गोष्टी तात्कळ मार्गी लावता येतील त्यासंबधीत आदेश देण्यात आले. तसेच दारू पिवून येणार्या शिक्षकाचे निलंबन करण्यात येईल, उद्याच शिक्षक मिळेल आणि 28 ऑगस्ट रोजी दौरा करण्याचे आश्वासन देण्यात आले. परंतू मागे जे घडले ते पुढे पुन्हा घडता कामा नाही यासाठी लेखी आश्वासनाचा आग्रह धरण्यात आला. सीईओ खरात यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. जर 28 ऑगस्टला सीईओ आले नाही तर 29 ऑगस्ट रोजी तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. यावेळी यशोवर्धन सपकाळ, सरपंच जुमानसिंग मुजालदा यांच्यासह आदिवासी बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.