◾ स्व. पंकज देशमुखांच्या पत्नीचे लेकरांसह उपोषण सुरु
◾जिल्हा मुख्यालयापर्यंत पोहोचली लढाई
बुलढाणा, 13 ऑगस्ट (गुड इव्हिनिंग सिटी) ः जळगांव जामोद येथील भाजप कार्यकर्ते पंकज देशमुख प्रकरणात पत्रकार परिषद घेवून आत्महत्येचा शिक्का मारून जिल्हा पोलिस प्रशासन मोकळे झाले असले तरी पंकज देशमुख यांचा खूनच झाला, यावर मात्र त्यांची पत्नी सुनिता आणि कुटूंबीय ठाम आहेत. मृतदेहाची अवस्था, परिस्थीतीजन्य पुरावे आणि काही संशयास्पद गोष्टींमुळे पंकज देशमुख मृत्यू प्रकरणात अनेक प्रश्न अनुत्तरीत असल्याची चर्चा आहे. सदर खूनाची चौकशी व्हावी, यासाठी जळगांव जामोदमधून सुरु असलेली ही लढाई आता जिल्हा मुख्यालयात पोहोचली असून सुनिता देशमुख बुलढाणा येथील जिजामाता प्रेक्षागारसमोर प्रांगणात उपोषण करीत आहेत. त्यांच्यासोबत उपोषण मंडपात त्यांची मुलगी आणि मुलगा दोन्ही आहेत.
जळगाव जामोद येथील भाजप कार्यकर्ते स्व.पंकज देशमुख यांच्या मृत्यूची सीआयडी चौकशी करण्याची मागणी अनेक वेळा करण्यात आली आहे. जळगाव जामोद विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ.संजय कुटे यांनी ही विधीमंडाळात चौकशी मागणी केली. परंतू अद्याप यावर प्रशासनाकडून कुठलेच पाऊल उचल्या जात नसल्यामुळे पंकज देशमुख यांच्या पत्नी सुनिता देशमुख यांनी आज 13 ऑगस्ट पासून आमरण उपोषणाला सुरूवात केली आहे. बुलढाणा शहरातील जिजामाता प्रेक्षागार परिसरात आमरण उपोषणास त्या त्यांच्या परिवारासह बसल्या आहेत. यासंदर्भात बुलढाणा जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, पंकज देशमुख यांच्या घातपात मृत्यु प्रकरणाला 100 दिवस उलटुन सुद्धा पतीच्या तपासात दिरंगाई होतांना दिसत आहे. पो.स्टे. जळगांव जामोद, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा खामगांव दौर्यावर यांना व यांचेकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तसेच प्रशांत डिक्कर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले आहे. त्यासोबतच आमदारांना सुद्धा पतीच्या फाईल पोहचविल्या. ऑनलाईन-ई-मेल निवेदने आणि जळगांव जामोद विधानसभा मतदार संघातील आमदार संजय कुटे यांनी विधानसभेत उच्चस्तरीय चौकशीची मागणी करुनही दीड महिना होत आहे. तरी आजपर्यंत पतीच्या प्रकरणाची गांभीर्यता दिसुन आली नाही. तसेच मागील आठवड्यात जळगांव जामोद मध्ये अनेक मंत्री, आमदार, खासदार येऊन गेले. परंतु याप्रकरणाकडे कोणीच लक्ष दिले नाही. त्यामुळे दुःख होत आहे. 6 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री हे जळगांव जामोद दौर्यावर आमदार संजय कुटे यांच्या घरी सांत्वन भेटीसाठी आले असता घराजवळ पोलीस बंदोबस्त होता. बँकेत गेली असता, घराजवळील पोलीस आईला निवेदन देणार आहेत का ? आईने नाही असे सांगून बँकेत गेली असे सांगीतले असता, मागे बँकेत येऊन एखादया आंतकवाद्याप्रामणे बँकेतुन उचलुन मुख्यमंत्री येवून परत प्रस्थान होईपर्यंत पोलीस स्टेशन जळगांव जामोद येथे नजरकैदेत बसवून ठेवण्यात आले. पंकज देशमुख हे 22 वर्ष भाजपाचे कार्यकर्ते होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना न्याय निवेदन देण्याचा हक्क होता. तरी आज आमदारांच्या दुःखामध्ये विघ्न न आणता निवेदन देणार नव्हती. पण पोलीसांनी कुठलीही शहानिशा न करता, कायदया विरोधात गैरव्यवहार झाला, तरी अद्यापपर्यंत कुठल्याच पोलीसांवर कार्यवाही झाली नाही. पंकज देशमुख यांच्या मृत्यूची सीआयडी चौकशीची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत बेमुदत आमरण उपोषण सोडणार नाही असा इशारा देण्यात आला आहे.