बुलडाणा जिल्हा माहेश्वरी युवा संघटन द्वारा प्रस्तुत
बुलढाणा, 16 ऑगस्ट (गुड इव्हिनिंग सिटी) ः श्री.रामदेव बाबा हे रामसापीर म्हणूनही ओळखले जातात. हे राजस्थानमधील एक प्रसिद्ध लोकदैवत असून ते भगवान कृष्णाचे रूप मानले जातात आणि त्यांनी अनेक चमत्कार केल्याचे सांगितले जाते. त्यांची समाधी राजस्थान मधील रामदेवरा येथे स्थित आहे.
स्थानिक बुलढाणा येथे रविवार 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता सहकार विद्या मंदिर येथील सांस्कृतिक भवनमधे श्री रामदेव बाबा यांच्या संपूर्ण जीवनाशी निगडित जिवंत नाट्यप्रस्तुती सादर केली जाणार आहे.या कार्यक्रमात अकोला येथील सुनील नावंदर आणि सोबत 125 कलाकारांचा समूह ही नाट्यप्रस्तुती सादर करणार आहे. हा कार्यक्रम बुलढाणा अर्बन चे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक यांच्या प्रेरणादायी संकल्पनेतून संपन्न होणार असून यासाठी बुलढाणा अर्बन चे अध्यक्ष डॉ.सुकेश झंवर व सहकार विद्या मंदिर च्या अध्यक्षा सौ.कोमलताई झंवर यांचे विशेष सहकार्य प्राप्त झाले आहे. या कार्यक्रमा दरम्यान जमा झालेली दानराशी ही गौरक्षण येथे गौसेवेसाठी सुपूर्द केली जाणार असून समस्त बुलढाणा वासियांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन बुलढाणा शहर सकल राजस्थानी समाज व बुलढाणा जिल्हा माहेश्वरी युवा संघटन द्वारे करण्यात आलेले आहे. त्यामुळे या भव्यदिव्य आयोजनाला मोठया संख्येने उपस्थित राहवे.