spot_img

बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाच्या वृत्तेश्वर गणेशोत्सव मंडळाकडून भजन स्पर्धा

बुलढाणा, 20 ऑगस्ट (गुड इव्हिनिंग सिटी)  ज्ञान आणि बुद्धीची देवता असलेला श्रीगणेश विद्या आणि कलेचा अधिपति आहे. पत्रकारिता ही सुद्धा एक कला आहे. त्याअनुषंगाने पहिल्यांदाच बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाकडून वृत्तेश्वर गणेशोत्सव मंडळाची स्थापना करण्यात आली असून याअंतर्गत बुलढाणा जिल्हा पत्रकार भवन परिसरात गणेशोत्सवादरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्यापैकी एक भजन स्पर्धा असणार आहे. भजन स्पर्धेत प्रथम विजेत्याला 7001 रूपयांचा पुरस्कार दिला जाईल. द्वितीय पुरस्कार 5001, तृतीय 3001, चतुर्थ 2001 तर पाचवा पुरस्कार एक हजार एक रूपयांचा असेल. पहिल्या पाच विजेत्यांना स्मृतिचिन्ह तसेच प्रमाणपत्र सुद्धा दिले जाईल. भजन स्पर्धेची अंतिम फेरी शनिवार, 30 ऑगस्ट 2025 रोजी होणार आहे. बुलढाणा जिल्हास्तरीय असलेल्या या भजनस्पर्धेची पहिली फेरी सोमवार, 25 ऑगस्ट 2025 रोजी जिल्हा पत्रकार भवन, बसस्टॅण्डसमोर, जिल्हा सैनिक मंगल कार्यालयाच्या बाजूला, बुलढाणा याठिकाणी पहिली फेरी सकाळी 10 वाजता सुरु होईल. भजन स्पर्धेसाठी काही नियमावली निश्चीत करण्यात आली आहे. त्यानुसार भजन मराठी किंवा हिंदी भाषेत असावे, शक्यतोवर संतांनी रचलेली भजने असल्यास उत्तम, पारंपरीक वाद्यांचाच वापर करावा, पहिल्या फेरीत तीन मिनीटांचा वेळ दिला जाईल आणि सर्वात महत्वाचे म्हणजे परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. सदर भजन स्पर्धा खुली असून स्पर्धकाचे वय 18 वर्षे पेक्षा कमी असू नये. स्पर्धेसाठी प्रवेश फी नाममात्र 200 रूपये ठेवण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे अभिषेक वरपे 7057029288 , राम हिंगे 9309936199, अजय काकडे 88882 65373  किंवा  रणजीतसिंग राजपूत 9850377344, यांच्याशी संपर्क करता येईल.

 

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत