बुलढाणा, 21 ऑगस्ट (गुड इव्हिनिंग सिटी) : येथील इंटेरियर डिझायनर हरीश शर्मा यांच्या चिखली रोडवरील वर्कशॉप मध्ये आग लागल्याची घटना घडली. दुपारी तीन वाजेच्या सुमारास लागलेले आगे मध्ये कुठलीही जीवित हानी झाली नसली तरी वित्तीय हानि मात्र झाली आहे. नगर परिषदेच्या अग्निशमन पथकाने तात्काळ घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली. चिखली रोडवरून केंब्रिज स्कूलमध्ये जाणाऱ्या रस्त्यावर शर्मा यांचे वर्कशॉप आहे. सदर वर्कशॉप मध्ये ठेवलेले रंगाचे साहित्य जळल्याची माहिती मिळाली आहे. बाकी कुठलेही नुकसान झाले नाही, हे सुदैव. सदर आगीचा व्हिडिओ आमच्या वाचकांसाठी आम्ही उपलब्ध करीत आहोत.