spot_img

महाबोधी महाविहाराची लढाई लवकरच जनआंदोलन होणार : भंते विनाचार्य

बुलढाणा, 23 ऑगस्ट (गुड इव्हिनिंग सिटी) : महाबोधी महाविहार बोधगया मुक्तीच्या समर्थनार्थ नागपूर दिक्षाभुमी ते चैत्यभुमी पर्यंत पहिल्या टप्प्यात सुरू असलेली धम्मध्वज जनसंवाद यात्रेचे 22 ऑगस्ट रोजी बुलढाणा शहरात दुपारी 10 वाजता आगमण झाले होते. त्याप्रसंगी बी.टी. अ‍ॅक्ट-1949 निरस्त करण्यासाठी बोधगया महाबोधी महाविहार मुक्त अंदोलनाचे मुख्य संयोजक भंते विनाचार्य यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी बिहार निवडणूकीत या अदोलनाचा काही प्रभाव पडेल का यावर बोलतांना सांगितले की, बिहार निवडणूकीत सर्व समाज ज्यावेळी एकत्र होतो. तेव्हा नुकसान होवो अगर फायदा होवो समाजाला परिवर्तन आवश्यकत असते. बौध्दांमुळे कुण्या पक्षाला नुकसान झाले तरी आम्हाला त्याच्याशी काही घेणे नाही. बौध्द समाजाची जी मागणी आहे. यामध्ये कोणतेही सरकार म्हणजे ते तेजस्वी यादव किंवा नितीश कुमार यांच्यापैकी कोणत्याही सरकारने ती पुर्ण केली पाहिजे. प्रत्येक पक्षाने आमच्या मागणीला सर्मथन दिले आहे. त्यामुळे बौध्द धर्म टिकला पाहिजे हे आमचे मुळ उदिष्ट आहे. कुठल्याही धर्मस्थळावर प्रतिबंध लावला जावू शकतो. पण त्यावर कायदा करणे चुकीचे आहे. त्याला आमचा विरोध आहे. देशात आजपर्यंत कुठल्या मंदिर, मस्जिद किंवा चर्च वर कायदा बनलेला नाही. बिहार मधील महाबोधी महाविहार साठी कायदा बनविण्यात आला. हिंदू आणि बौध्द धर्मियांमध्ये लढाईचे षडयंत्र सत्ताधार्‍यांकडून सुरू आहे. परंतू दोन्ही धर्मियांमध्ये सामाजिक सद्भाव अभेद्य असल्याने हे सर्व मनसुबे फलदृप होणार नाही. तसेच बिहार मधून महाबोधी महाविहाराची लढाई देशव्यापी जनआंदोलनात परिर्वतीत होणार असा विश्‍वास भंते विनाचार्य यांनी व्यक्त केला आहे.
आता याचा काही परिणाम येणार्‍या बिहार विधानसभा निवडणूकांवर पडणार का हे निवडणूकानंतरच स्पष्ट होईल किंवा यावर सरकार निवडणूकांपूर्वी काही निर्णय घेतात हे बघावे लागेल.

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत