मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे एसपी तांबे यांचे आवाहन
बुलडाणा, २३ ऑगस्ट (गुड इव्हिनिंग सिटी) : बुलढाणा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने उद्या “सायकलथॉन” स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या नेतृत्वाखाली बुलढाणा जिल्हा पोलीस दल विविध कार्यक्रमांचे आयोजन करत आहे. क्रीडा विभाग भारत सरकार यांच्या निर्देशानुसार फिट इंडिया मोहिमे अंतर्गत उद्या रविवार दिनांक २४ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता “सायकलथॉन” स्पर्धेचे पोलीस अधीक्षक कार्यालय बुलढाणा येथे आयोजन करण्यात आले आहे. तरी स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी केले आहे.