बुलढाणा, 23 ऑगस्ट (गुड इव्हिनिंग सिटी) : रस्त्यावरून जाणाऱ्या महिलेची दुचाकी स्वार चोरांनी सोनसाखळी लंपास केली. ही घटना बुलढाण्यातील क्रीडा संकुल रोड वरील वावरे ले आऊट भागात थोड्यावेळापूर्वी म्हणजेच आज रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली.
- वंदना भागवत चोपडे (रा. वावरे ले आऊट बुलढाणा )ह्या एका ठिकाणाहून जेवण केल्यानंतर घराच्या दिशेने निघाल्या होत्या. दरम्यान, सालासार मार्बल समोर अंधाराचा फायदा घेऊन दुचाकी स्वार चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी लंपास केली. तोंडाला रुमाल बांधून आलेल्या चोरट्याने लगेचच पळ काढला. स्थानिक नागरिकांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु तोपर्यंत चोरटे फरार होण्यात यशस्वी झाले होते. बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रवि राठोड हे घटनास्थळी उपस्थित असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्याचा शोध सुरू आहे. पीडित महिला तक्रार देण्यासाठी शहर ठाण्यात पोहोचल्या आहेत. पीडित महिलेचे पती भागवत चोपडे मलकापूर येथील सेंट्रल बँक मध्ये कर्मचारी आहेत.