spot_img

सहकार क्षेत्रात शिवाजीराव तायडे यांची नवी झेप !

मानद सहकार मंचाच्या जिल्हाध्यक्षपदी वर्णी
बुलढाणा, 26 ऑगस्ट (गुड इव्हिनिंग सिटी) ः बुलढाण्याच्या सामाजिक व सहकार क्षेत्रातील महत्वाचा चेहरा म्हणून उदयास आलेल्या शिवाजीराव तायडे यांना सहकार क्षेत्रातील महत्वाच मानल्या जाणार्‍या मानद सहकार मंच समृद्धी फाउंडेशनच्या जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. सहकार क्षेत्रातील दीर्घ अनुभव व सहकार चळवळीशी असलेली आवड, आस्था तसेच सहकाराशी असलेली निष्ठा पाहता माँ जिजाऊ अर्बन परिवाराचे उपाध्यक्ष, तथा सहकार भारतीचे बुलढाणा तालुकाध्यक्ष शिवाजीराव तायडे यांची मानद सहकार मंच समृद्धी फाउंडेशन मुंबई या संस्थेच्या बुलडाणा जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. 24 ऑगस्ट रोजी डॉ.नानासाहेब धर्माधिकारी सभागृह कल्याण मुंबई येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात सहकार रत्न मधुकरराव बोडखे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष मानद सहकार मंच समृद्धी फाउंडेशन मुंबई यांचे हस्ते व तानाजीराव कवडे माजी सहनिबंधक सहकारी संस्था लेखापरीक्षण महाराष्ट्र राज्य, मधुकरराव गायकर संस्थापक यशोमंदिर मंत्रालयीन पतपेढी मुंबई, डॉ.संतोषराव गाढे, रुपेश बावनकर, नलिनीताई बोडके, भोजाजी बनसोडे यांचे उपस्थित नियुक्ती पत्र देण्यात आले.
श्री तायडे यांचे नेतृत्वात बुलढाणा जिल्ह्यात 13 तालुकाध्यक्ष, 13 शहराध्यक्ष, तसेच अनेक सहकार मित्र राहतील तायडे यांना या अगोदर महाराष्ट्र मराठा सोयरिक तर्फे अंभोडा भूषण पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आलेले आहे. शिवाजीराव तायडे हे समाजशील व्यक्तीमत्व म्हणून बुलढाण्यात त्यांचा लौकिक आहे. ते कुठल्याही सामाजिक कार्यात तन मन धनाने सहभागी होतात. माँ जिजाऊ अर्बनच्या गत महिन्यात ग्रामीण भागात नांद्राकोळी व हातेडी येथे शाखा काढण्यात आल्या आहे. त्यामुळे यावरून दिसून येते की सहकार क्षेत्राला शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याचे काम करत आहे. मानद सहकार मंच समृद्धी फाउंडेशन मुंबई या संस्थेचा मुख्य उद्देश सहकारी संस्थांतील पदाधिकारी, संचालक,अधिकारी, कर्मचारी, यांना प्रशिक्षण देणे, सहकारातील तरुण युवकांसाठी सहकार फॉर युथ व्याख्यानमाला जिल्हा, तालुका, शहर, या ठिकाणी आयोजित करून त्यांना सहकाराच्या मुख्य प्रवाहात आणणे तसेच ग्रामीण व शहरी भागातील महिलांचे सक्षमीकरण करणे, माजी वसुंधरा अभियान राबविणे, ग्रामीण भागातील महिलांकडून बीज मोदक तयार करून घेऊन त्यांना आर्थिक मोबदला देणे तसेच पर्यावरणाच्या संगोपनासाठी रस्त्याच्या दुतर्फी भागात झाडे लावून त्यांचे संगोपन करणे.

नियुक्ती नंतर शिवाजीराव तायडे यांनी सांगितले की, मानद सहकार समृध्दी फाउंडेशनने जो माझ्यावर विश्‍वास टाकला आहे. मी त्याला सार्थ ठरविण्यासाठी प्रयत्न करेल. सहकारच्या माध्यमातून समृध्दीकडे जाण्याचा मार्ग हा तळगळापर्यंत पोहचविण्यासाठी कटिबध्द राहिल. जिल्ह्यात सहकार क्षेत्राला नव उभारी देण्याचा प्रमाणिक प्रयत्न करणार असल्याची भावाना व्यक्त केली.
शिवाजीराव तायडे यांची निवड झाल्याबद्दल विविध क्षेत्रातून त्यांचे कौतुक होत आहे.

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत