वृत्तेश्वर गणेशोत्सव मंडळ, बुलढाणा जिल्हा पत्रकार संघ आणि थायोकेअर लॅब यांच्या संयुक्त विद्यमाने
बुलडाणा, 2 सप्टेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) : शहरातील नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण आरोग्य उपक्रम राबवण्यात येत आहे. वृत्तेश्वर गणेशोत्सव मंडळ, बुलढाणा जिल्हा पत्रकार संघ आणि थायोकेअर लॅब यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत थायरॉईड तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर 3 सप्टेंबर,, बुधवार रोजी सकाळी 9 वाजता जिल्हा पत्रकार भवन, सैनिकी मंगल कार्यालयाजवळ, बस स्टॅन्ड समोर, बुलढाणा येथे होणार आहे. थायरॉईड विकारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून अनेकांना याची जाणीव होत नाही. हायपरथायरॉईडीझम व हायपोथायरॉईडीझम ही दोन प्रमुख प्रकारची थायरॉईड विकारे असून त्यांची लक्षणे वजन कमी होणे, घाम येणे, झोप न लागणे, हात थरथरणे, जलद हृदयगती, चिंता व अशक्तपणा, थकवा, सुस्ती, वजन वाढणे, थंडी वाजणे, बद्धकोष्ठता, कोरडी त्वचा, मासिक पाळीतील अडचणी, वंध्यत्व इत्यादी. या लक्षणांपैकी कुठलेही लक्षण जाणवल्यास नागरिकांनी या तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा. तपासणीसाठी येताना आधार कार्ड सोबत आणणे आवश्यक आहे. हा उपक्रम नागरिकांच्या आरोग्यविषयक जागरूकतेस चालना देणारा असून, या शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे.