बुलढाणा, 7 सप्टेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) ः शोले स्टाईल आंदोलनासाठी बुलढाणा शहरातील कारंजा चौकातील बीएसएनएलचे टॉवर प्रसिध्द झाले आहे. अनेक वेळा विविध मागण्यांसाठी त्या टॉवर वर चढून आंदोलन केले जाते. असाच प्रकार आज 7 सप्टेंबर रोजी दुपारी 3.30 वाजातच्या सुमारास समोर आला आहे. त्या व्यक्तीच्या मागण्या काय आहेत. त्याबाबत प्रशासन जाणून घेण्यासाठी प्रयत्न करीत आहे. सदर व्यक्ती हा बीएसएनएलच्या टॉवरच्या टोकावर गेला आहे. अग्निशमन विभागाचे पथक बचावासाठी पोहचले आहे. तो व्यक्ती कोण आहे व त्याच्या काय मागण्या आहेत त्या कळू शकल्या नाही. परंतू कोर्ट रोडवर गर्दी जमल्याचे दिसून आले आहे.