मराठी पत्रका
बुलढाणा, 8 सप्टेंबर (गुड इव्हिनिंग सिटी): मराठी पत्रकार परिषद अंतर्गत डिजिटल मीडिया परिषदेच्या बुलढाणा जिल्हाध्यक्षपदाची सूत्रे टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीचे जिल्हा प्रतिनिधी गणेश सोळंकी यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत. तर माजी जिल्हाध्यक्ष झी 24 तासचे प्रतिनिधी मयूर निकम यांची प्रदेश प्रतिनिधी पदी वर्णी लागली आहे. डिजिटल मिडीया परिषदेचे विभागीय सचिव जितेंद्र कायस्थ आणि पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष रणजीत सिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली आज, जिल्हा पत्रकार भवनमध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सर्वानुमते सदर निवड करण्यात आली आहे.
पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या मराठी पत्रकार परिषदेचा विस्तार राज्यभर होत आहे. बुलढाण्यातही पत्रकार संघाच्या माध्यमातून पत्रकारांच्या हितासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असून, ‘पत्रकारांचा आवाज’ म्हणून ही संघटना नावारूपास आली आहे. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख तसेच डिजिटल मीडिया परिषदेचे राज्याचे प्रमुख अनिल वाघमारे यांच्या मार्गदर्शनात आणि प्रदेश उपाध्यक्ष अनिल उंबरकर, अमरावती विभागीय सचिव जितेंद्र कायस्थ, मराठी पत्रकार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष चंद्रकांत बर्दे यांच्या नेतृत्वात उपरोक्त नियुक्त्या घोषित करण्यात आल्या. नियुक्ती झालेल्या मान्यवरांचा गौरव जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आला. याप्रसंगी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष रणजीत सिंग राजपूत, प्रदेश प्रतिनिधी नितीन शिरसाट, चिटणीस कासिम शेख, कार्याध्यक्ष वसीम शेख, प्रेमकुमार राठोड, सचिव शिवाजी मामनकर, डिजिटल मीडिया परिषदेचे विभागीय सचिव जितेंद्र कायस्थ, जिल्हा सरचिटणीस दीपक मोरे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अभिषेक वरपे उपस्थित होते.