बुलढाणा, 25 सप्टेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) : राज्यभरात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. नदी नाल्यांना पूर येऊन अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालेले आहे. या संपूर्ण ओला दुष्काळ सदृश्य परिस्थितीचा परिणाम परीक्षांवरही झाला आहे. महाराष्ट्र शासनाने पदभरतीची परीक्षा पुढे ढकलली आहे. सरळसेवेने तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील पदांसाठी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय / दंत महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयातील गट-क तांत्रिक/अतांत्रिक संवर्गातील सरळसेवा कोट्यातील रिक्त पदे भरण्याकरिता राज्यस्तरीय ऑनलाईन स्पर्धा परीक्षा राज्यातील विविध केंद्रावर स्पर्धा परीक्षा- २०२५ सुरु आहे. परंतु सोलापूर जिल्हयासह महाराष्ट्रात विविध ठिकाणी मागील आठड्यापासून अती मुसळधार पावसामुळे राज्यामध्ये अपात्कालीन पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने दिनांक 25-09-2025 व 26-09-25 रोजीची आयोजित करण्यात आलेली परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. याबाबत शासनाकडून काल, 24 सप्टेंबर रोजी नोटिफिकेशन काढण्यात आले आहे. उमेदवारांच्या मोबाईलवर एसएमएस द्वारे तसेच त्यांच्या ई-मेल ऍड्रेस वर सुद्धा याबाबतची माहिती देण्यात आली आहे. राज्यभरातून लाखो उमेदवार सदर परीक्षेची तयारी करून आहेत. बुलढाणा जिल्ह्यातूनही हजारो उमेदवारांनी सदर परीक्षेचे आवेदन भरलेले आहे. बुलढाण्यातील अनेक उमेदवारांसाठी आपल्या पसंतीनुसार अमरावती, नागपूर, जालना, छत्रपती संभाजीनगर असे परीक्षा केंद्र निवडलेले होते. उद्या आणि परवा सदर परीक्षा केंद्रांवर परीक्षा होणार होती. परंतु तांत्रिक अ तांत्रिक संवर्गातील पदांसाठीची ही परीक्षा आता पुढे ढकलण्यात आली आहे. वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष महाराष्ट्र राज्य यांनी प्रसिद्धीस दिलेले नोटिफिकेशन गुड इव्हिनिंग सिटी कडून या ठिकाणी देण्यात येत आहे.



