spot_img

अल्पवयीन तरुणी किडनॅप! मोताळ्यात नाकाबंदी… नंतर राडाच राडा

बुलढाणा, 10 ऑक्टोबर (गुड इव्हिनिंग सिटी) : एका तासापूर्वी मोताळ्यात राडाच राडा झाला.
मलकापूरहून एका सोळा वर्षीय युवतीचे अपहरण झाले आणि तिला घेऊन जाणारी स्विफ्ट डिझायर कार मोताळ्यात पोलिसांनी रोखली. दरम्यान पोलिसांची नाकाबंदी तोडून कार पुढे सुसाट निघाली. पण गाडीचे टायर फुटले आणि सदर गाडी बाजूच्या एका शेतामध्ये जाऊन अपघातग्रस्त झाली. विशेष म्हणजे या गाडीच्या मागे मुलीला वाचविण्यासाठी दुसरी गाडी पिच्छा करत होती. मुलीला ताब्यात घेतले गेले. अपहरण करणारे तीन जण पोलिसांनी पकडले. पकडलेल्यांपैकी दोन जण अल्पवयीन असल्याचे समजते. या सर्व घटनेदरम्यान मुलगी बेशुद्ध पडली होती. तिला मोताळ्यातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारानंतर ती शुद्धीत आली. गुड इव्हिनिंग सिटीला मिळालेल्या माहितीनुसार मुलगी आणि अपहरण करणारे मुलं “एक ही समाज के है”. हा प्रकार अपहरणाचा आहे की प्रेम प्रकरणाचा याचा तपास बोराखेडी पोलीस करीत आहेत. मुलीच्या नातेवाईकांनी मलकापूर पोलिसांमध्ये धाव घेतल्यानंतर पोलीस प्रशासनाकडून बोराखेडी पोलिसांना सुचित करण्यात आले होते त्यानंतर बोराखेडी पोलिसांनी आज सकाळी नऊ वाजेपासून साक्षी हॉटेल जवळ आणि बोराखेडी फाटा अशा दोन ठिकाणी नाकाबंदी केली होती. दरम्यान लाल रंगाची ही स्विफ्ट डिझायर साक्षी हॉटेल जवळ थांबवण्यात आली परंतु अपहरण करणाऱ्या आरोपींनी गाडी थांबवण्याचे नाटक केले आणि पोलीस जवळ येत असल्याचे पाहून पुन्हा गाडी सुसाट पुढे नेली. बोराखेडी फाट्याजवळच्या नाकेबंदीला पण त्यांनी न जुमानता गाडी जेव्हा बुलढाण्याच्या दिशेने टाकली तेव्हा गाडीचे टायर फुटले आणि गाडी थेट शेतात घुसली. त्याठिकाणी सर्व आरोपी ताब्यात आले. या गाडीचा पिच्छा करणाऱ्या दुसऱ्या गाडीतील लोक अत्यंत आक्रमक होते. तिथे जमलेल्या काही जमावाने आणि या लोकांनी मिळून सदर स्विफ्ट डिझायर जाळून टाकली. आरोपी मुलांना जबर मारहाण सुद्धा करण्यात आली. अर्थात हा प्रकार अपहरणाचा आहे का याबाबत प्राथमिक शंका व्यक्त होत आहे.

 

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत