बुलढाणा, 11 ऑक्टोबर (गुड इव्हिनिंग सिटी) : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांना आपण या आधी त्यांचे समर्थक खांद्यावर घेतल्याचे पाहिले आहे. पण आज त्यांनी भाजप कार्यकर्त्यांनी साडी नेसवली त्या मामा पगारेंना खांद्यावर घेतलं. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीमध्ये कल्याणमध्ये आंदोलन करण्यात आलं. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रकाश मामा पगारे यांना खांद्यावर उचलून घेतलं आणि त्यांना मंचावर नेलं. आंदोलन सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेनं वकिलानं फेकल्याच्या प्रकरणाचा आणि काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रकाशमामा पगारे यांचा भाजप कार्यकर्त्यांनी अपमान केल्याच्या निषेधार्थ काँग्रेसनं आंदोलन करण्यात आलं. डोंबिवली मध्ये भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रकाशमामा पगारे यांना साडी नेसवली होती. त्याच पगारे मामांना हर्षवर्धन सपकाळ यांनी खांद्यावर घेऊन मंचावर नेलं. हर्षवर्धन सपकाळ यांनी या माध्यमातून प्रकाशमामा पगारे यांच्यासोबत पक्ष असल्याचं दाखवून दिलं आहे. काँग्रेसच्या वतीनं सर्वोच्य न्यायालयाचे सरन्यायधीश भूषण गवई यांच्या दिशेनं बूट फेकण्याची घटना घडली होती, त्याचा देखील काँग्रेसनं निषेध केला. भाजप पदाधिकाऱ्यांकडून साडी नेसवत त्याचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता. त्यानंतर प्रकाश मामा पगारे यांचा रक्तदाब वाढल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी प्रकाशमामा पगारे यांच्या सोबत संवाद साधला होता.मामा तुम्ही घाबरु नका काँग्रेसचे तुमच्या सोबत आहे. आम्हाला तुमच्या बद्दल बाळासाहेब थोरातांनी माहिती दिली आहे. ५० वर्षापासून तुम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते आहात. तुमचा खूप आदर आहे, असं राहुल गांधी म्हणाले होते. काँग्रेसचे पदाधिकारी मामा पगारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केली होती. ही पोस्ट त्यांना कोणी तरी पाठविली होती . ती त्यांनी पुढे फॉरवर्ड केली होती. पगारे यांनी पंतप्रधान मोदी यांचा अपमान केल्याचा दावा करत भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब आणि पदाधिकारी संदीप माळी यांना पगारे यांना रस्त्यात गाठून भर रस्त्यात साडी नेसविली होती. या घटनेवरुन काँग्रेस आणि भाजप आमने सामने आली होती. काँग्रेस या प्रकरणी आक्रमक झाली होती. पगारे यांना सोबत घेऊन काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे हे पोलिस उपायुक्तांच्या भेटीला गेले. त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाईची मागणी केली होती. या चर्चे दरम्यान पगारे यांचा रक्तदाब वाढला होता. त्यांना तातडीने खाजगी रुग्णलयात दाखल केले गेलं होतं.त्यावेळी देखील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मामा पगारे यांच्यासोबत संवाद साधला होता.



