spot_img

पानसरे जाणार…एसपी निलेश तांबेंची दिवाळी बुलढाण्यातच ! कॅटकडून तांबेच्या बाजूने कौल

बुलढाणा, 17 ऑक्टोबर (गुड इव्हिनिंग सिटी) ः बुलढाणा जिल्हा पोलिस प्रशासनाचे ‌‘नेतृत्व‌’ कुणाकडे, याचा निर्णय शेवटी झाला आहे. विश्व पानसरेंच्या विरोधात सेंट्रल ॲडमिनीस्ट्रेटीव्ह ट्रिब्यूनलने निर्णय देत बुलढाणा जिल्हा अधीक्षकपदी निलेश तांबे यांच्या बाजूने कौल दिला असल्याची पक्की माहिती गुड इव्हिनिंग सिटीला प्राप्त झाली आहे. यासंदर्भात निकालाची प्रत तूर्तास उपलब्ध नसली तरी पानसरे यांना बुलढाणा सोडावे लागणार, हे स्पष्ट आहे. ‌‘जाणार की, थांबणार ?‌’ या शंकेची लटकलेली तलवार निलेश तांबे यांच्या डोक्यावरून हटल्याने त्यांनीही सुटकेचा निःश्वास सोडला असणार. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पानसरे यांच्या बदलीचे आदेश धडकले होते. त्यानंतर पानसरे यांनी स्वतःच्या बदलीला स्थगनादेश मिळवून गृहविभागाला धक्का दिला होता. 9 महिन्यातच बदली कशी ? जेमतेम दोन वर्ष झाल्यानंतर बदली अपेक्षित असते, मग त्याआधीच बदली का केली ? असा मुद्दा पानसरेंनी उपस्थित केला होता. 22 मे पासून जिल्ह्यात नाट्यमय घडामोडी सुरू झाल्या होत्या. गृहविभागाने एसपींच्या बदल्यांची यादी जाहीर केली होती त्यात विश्व पानसरेंना अमरावती येथील राज्य राखीव दलाचे समादेशक म्हणून पाठविण्यात आले. अर्थात जिल्हा पोलिस अधीक्षक पदाशी समकक्ष असले तरी सदर बदली साईड पोस्टींग म्हणून गणल्या जाते. त्यांच्या जागी बुलढाणा जिल्हा पोलिस अधीक्षकपदी निलेश तांबे यांची वर्णी लागली होती. 2018 च्या आयपीएस बॅचचे अधिकारी तांबे यांची जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून पहिलीच पोस्टींग होती. ते अत्यंत उत्साहात होते. त्यांनी बदलीचा आदेश मिळताच तत्काळ बुलढाण्याकडे धाव घेतली आणि रात्री 11.30 वाजता बुलढाण्याचा प्रभार घेतला. इकडे पानसरेंनी मात्र बुलढाणा न सोडण्याचा निर्णय घेतला होता. दूसऱ्या दिवशी, 23 मे रोजी सकाळी, कोर्ट उघडल्याबरोबर पहिल्या सेकंदाला पानसरेंनी बदलीविरोधात अर्ज दाखल केला. ॲड. आर.जी. वालिया यांच्या मार्फत पानसरेंनी प्रकरण दाखल केले होते. ॲड. वालिया हे सर्वोच्च न्यायालय आणि दिल्ली उच्च न्यायालयात प्रॅक्टीस करणारे प्रथितयश वकील आहेत. इकडे कॅटकडून पानसरेंचा अर्ज मंजूर करण्यात आला आणि तातडीने त्यावर सुनावणी सुरु झाली होती. दोन्हीकडचे जाबजबाब नोंदविले गेले होते. निकालासाठी तब्बल तीन वेळा तारीख पुढे ढकलण्यात आली होती. मागील महिन्यात सदर प्रकरण क्लोज करून निकालासाठी ठेवण्यात आले होते. निकाल कुठल्याही क्षणी लागण्याची शक्यता होती. शेवटी, आज 17 ऑक्टोबर रोजी कॅटने निकाल दिल्याचे समजते. या निकालात निलेश तांबे यांच्या बदलीला आव्हान देणारी तक्रार खारीज केली असल्याचे समजते. तर पानसरे यांना त्यांच्या बदलीच्या ठिकाणी रुजू होण्याचे आदेश देण्यात आल्याचे समजते.

 

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत