बुलढाणा, 19 ऑक्टोबर (गुड इव्हिनिंग सिटी) : रायपूर येथे आयशरने जबर धडक दिल्याने एक युवक जागीच ठार झाला आहे. मुबारक शाह सलीम शाह वय वर्ष 28 असे मृतक युवकाचे नांव असून त्याच्या मृत्यूने गावात शोककळा पसरली आहे. आज सकाळी 7 वाजेच्या सुमारास रायपूरच्या पेट्रोल पंप जवळ ही दुर्दैवी घटना घडली. भाजीपाला घेण्यासाठी जात असताना मुबारक शाहयांना चिखली दिशेने येणाऱ्या आयशरने जबरदस्त धडक दिली. मुबारक शाह हे गंभीर जखमी झाले त्यांना गावातील नागरिकांनी ताबडतोब बुलढाण्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय मध्ये आणले असताना डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे रायपूर या गावात शोक पसरला आहे.



