spot_img

त्रिशरण चौकातील सिग्नल अज्ञात वाहनाच्या धडकेत उखडला

सिग्नलची दिवाळी कधी..?
बुलढाणा, 22 ऑक्टोबर (गुड इव्हिनिंग सिटी) : बुलढाणा शहरातील चिखली रोडवरील सिग्नलच्या खांबला अज्ञात वाहनाने धडक दिली आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी यासाठी शहरातील मुख्य चौकांमध्ये सिग्नल प्रणाली उभारण्यात आली आहे. गेल्या वर्षभरापासून सिग्नल सुरू होण्यास कुठलाच माहूर्त आजतागायत सापडलेला नाही. बुलढाणा शहरातील वाहनधारकांना वाहतूक नियमांची शिस्त लागली पाहिजे. अपघाताच्या घटना टाळण्यासाठी याची उभारणी करण्यात आली आहे. परंतु असे काही न घडता याच्या विपरीत घडतांना दिसून येत आहे. अनेक राजकीय पक्षांनी सिग्नल सुरू व्हावे यासाठी निवेदने दिली परंतु कशाचा परिणाम झालेला नाही. बुलढाणेकरांसाठी सिग्नल फक्त शोभेची वस्तू ठरली आहे. बुलढाणा चिखली महामार्गावरील त्रिशरण चौकात एका अज्ञात वाहनाने सिग्नलच्या खांबाला जोरदार धडक दिल्याने खांब कोसळला आहे. यामुळे काही त्या भागातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती. आता कुण्या वाहनाने धडक दिली हे शोधण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे.
https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत