spot_img

पाडळीच्या “वैभवा”त भर ! वैभव भुतेकर एमपीएससी परीक्षेत राज्यातून व्दितीय

बुलढाणा, २५ ऑक्टोबर (गुड इव्हिनिंग सिटी) ः बुलढाणा तालुक्यातील पाडळी गावचे भुमिपुत्र वैभव बबनराव भुतेकर यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाव्दारे घेण्यात आलेल्या परिक्षेव्दारे सहाय्यक आयुक्त समाजकल्याण वर्ग एक पदी निवड झाली आहे. त्यांचा राज्यातून व्दितीय क्रमांक आला आहे. गुड इव्हिनिंग सिटीने वैभव भुतेकर यांच्याशी संपर्क साधून त्यांचे अभिनंदन केले. त्यांनी गुड इव्हिनिंग सिटीला प्रतिक्रिया देतांना सांगितले की, प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद हायस्कूल पाडळी येथे झाले आहे. दहावी नंतरचे शिक्षण जिल्हा परिषद ज्यूनिअर कॉलेज पाडळी येथेच झाले. त्यानंतर कला शाखेच्या पदवीचे शिक्षण विदर्भ महाविद्यालय बुलढाणा येथे झाले. त्यानंतर महात्मा फुले समाजकार्य महाविद्यालय येथे समाजकार्य विषयातून एमएसडब्ल्यू ची पदव्युत्तर प्राप्त केली. वैभव यांनी स्पर्धा परिक्षेची तयारी आपल्या गावतच केली. कुठल्याही प्रकारचे क्लासेस त्यांनी लावले नाही. स्वतः मेहनतीवर आज त्यांनी हे यश संपादन केले आहे. वैभव भुतेकर यांची २०२१ मध्ये कर सहाय्यक पदी निवड झाली होती. त्यानंतर २०२१ मंत्रालय लिपिक, २०२५ अदिवासी आश्रमशाळेवर गृहपाल आणि २०२३ मध्ये त्यांची जालना जिल्ह्यातील वालसा खालसा येथील जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक या पदावर निवड झाली होती. सध्या ते वालसा खालसा येथील शाळेवर कार्यरत आहे. काल २४ ऑक्टोबर रोजी एमएपएससी चा निकाल लागला त्यामध्ये त्यांची सहाय्यक आयुक्त समाजकल्याण पदी निवड झाली आहे. त्यांचा राज्यातून व्दितीय क्रमांक आला आहे. ते सध्या त्यांच्या पाडळी या गावी आहेत. त्यांच्या निवडी बद्दल त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. ते आपल्या यशाचे श्रेय आई वडील व गुरूजनांना देतात.

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत