spot_img

निष्ठेचा शिलेदार बुलढाणा राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदी

नरेश शेळकेंवर मोठी जबाबदारी

बुलढाणा, 28 ऑक्टोबर (गुड इव्हिनिंग सिटी) : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदी नरेश शेळके यांची नियुक्ती झाली आहे. रेखाताई खेडेकर यांच्या राजीनाम्यानंतर गुड इव्हिनिंग सिटीने नरेश शेळके यांच्या कडे सुत्रे जातील हे केलेले सुतोवाच खरे ठरले आहे. आज मुंबईत प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या हस्ते नरेश शेळके यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले आहे. पुढील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता नरेश शेळके यांच्या नेतृत्वाखाली लढल्या जाणार आहे हे निश्चित झाले आहे. शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादीचे दोन भाग झाल्यानंतर शरद पवार यांची साथ न सोडणाऱ्यांना प्राधान्य दिल्या जात आहे. जे निष्ठावान आहेत आणि पक्षाशी प्रामाणिक आहेत, त्यांची दखल वरिष्ठ पातळीवरून घेतल्या गेली.

जिल्हाध्यक्ष म्हणून मागील दोन वर्षांपासून नरेश शेळके यांचे नांव आघाडीवर होते. परंतु रेखाताईंकडे नेतृत्व सोपविल्यानंतर शेळके यांना कार्याध्यक्षपदी समाधान मानावे लागले होते. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुप्रियाताईंच्या नेतृत्वात शेळके जिल्हाभर उत्कृष्ट काम करीत आहेत. पक्ष संस्थापक शरद पवार यांना आयुष्यभर साथ देणाऱ्यांचा सत्कार करीत ‘शिलेदार निष्ठेचे’ हा पुरस्कार सोहळा त्यांनी यशस्वीपणे केला होता. विशेष म्हणजे त्यांच्या या उपक्रमाचे पक्षाने कौतुक करीत राज्यभर ‘शिलेदार निष्ठेचे’ हा कार्यक्रम राबविण्याच्या इतर जिल्ह्यांना सूचना केल्या होत्या. पक्षीय, राजकीय आणि सामाजिक अशा तिनही योगदानाबाबत नरेश शेळके यांचा नावलौकिक आहे. महत्वाचे म्हणजे महाविकास आघाडीच्या जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांशी त्यांचे स्नेहबंध पक्के आहेत. सर्वसमावेशक नेतृत्व असणाऱ्या नरेश शेळके यांना राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सोपविले आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जबाबदारी नरेश शेळके यांच्या खांद्यावर असणार आहे. यावेळी शरद पवार, प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे, खा.सुप्रिया सुळे यांच्यासह इतर पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती.

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत