62 लाखांचा मुद्देमाल जप्त; 61 जणांवर गुन्हा दाखल
खामगाव, १ नोव्हेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) ः अपर पोलीस अधिक्षक खामगांव डॉ.श्रेणिक लोढा यांच्या पथकाने शेगाव येथील जुगार अड्यावर मोठी कारवाई केली आहे. शेगाव येथील जुगार अड्यावर मोठी कारवाई करीत नगदी १७ लाख ५२ हजार ३२० रुपयासह १२ चारचाकी वाहन, ५ मोटार सायकल, ५२ मोबाईल सह एकुण ६२ लाखापेक्षा जास्त रुपयाचा मुदेमाल जप्त केला आहे. ३१ ऑक्टोबर रोजी डॉ. श्रेणिक लोढा, अपर पोलीस अधिक्षक, खामगांव यांना मिळालेल्या माहीतीवरुन आदर्श रिसोर्ट, खामगांव रोड, शेगांव येथे काही लोक जुगार खेळत असल्याची माहीती मिळाल्यावरुन डॉ. श्रेणिक लोढा यांच्या सह अपर पोलीस अधिक्षक, कार्यालय. खामगांव येथील सहायक पोलीस निरीक्षक सचिन पाटील, पोहेकों प्रभंजन जोशी, शिवशंकर वायाळ तसेच पोस्टे खामगांव शहर येथील सफौ बाळू डाबेराव, पोहेकों गोपाल सातव, पोहेकॉ शेख मुजीब, पोहेकों नितीन पाटील, पोहेकॉ संदिप गवई, पोकों अमरदीप ठाकूर, पोकों आशीष ठाकूर यांनी ३१ ऑक्टोबर रोजी रात्री ११.५० वाजता आदर्श रिसोर्टवर पंचासह रेड केली असता एकुण ६० आरोपी जुगार खेळतांना मिळुन आल्याने त्यांचे कडुन नंगदी १७ लाख ५२ हजार ३२० रुपयासह १२ चारचाकी वाहन, ५ मोटार सायकल, ५२ मोबाईल सह एकुण ६२ लाख २ हजार ६४० रुपयाचा मुदेमाल जप्त केला आहे. एकुण ६१ लोकांच्या विरुध्द जुगार कायदयान्वये पोस्टे शेगांव शहर येथे कलम ४, ५ महाराष्ट्र जुगार कायदयाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कार्यवाही निलेश तांबे, पोलीस अधिक्षक, बुलडाणा यांचे मार्गदर्शनाखाली डॉ. श्रेणिक लोढा, अपर पोलीस अधिक्षक, खामगांव, प्रदिप पाटील. उपविभागीय पोलीस अधिकारी, खामगांव, सपोनि सचिन पाटील, पोहेकों प्रभंजन जोशी, पोकों शिवशंकर वायाळ व पोस्टे खामगांव शहर येथील सफो बाळू डाबेराव, पोहेकॉ गोपाल सातव, पोहेकों शेख मुजीब, पोहेकों नितीन पाटील, पोहेकॉ संदिप गवई, पोकॉ अमरदीप ठाकूर, पोकों आशीष ठाकूर पोलीस अंमलदार यांनी केली आहे. सदर गुन्हयांचा पुढील तपास पो. नि. नितीन पाटील पोलीस निरीक्षक पोस्टे शेगांव शहर यांचे आदेशाने पो.उप.नि. संदिप बारींगे हे करीत आहे
|
|



