बुलढाणा, १ नोव्हेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) ः जळगाव जामोद तालुक्यातील पळशी फाटा येथे ५ किलो ४२ ग्रॅम गांजा किंमत १ लाख ८४० रूपयांचा गांजा एलसीबीच्या पथकाने जप्त केला आहे. एलसीबीचे पोलिस निरीक्षक सुनिल अंबुलकर यांच्या नेतृत्वाखाली ३१ ऑक्टोबर रोजी ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार जळगाव जामोद तालुक्यातील पळशी फाटा येथे अक्षय तेजराव कोकाटे रा.पळशी सुपो याच्याकडून ५ किलो ४२ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. याची किंमत १ लाख ८४० रूपये व मोबाईल किंमत १० हजार रूपे असा एकूण १ लाख १० हजार ८४० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी अक्षय तेजराव कोकाटे याच्या जळगाव जामोद पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलिस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलिस अधीक्षक श्रेणिक लोढा, अपर पोलिस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुनिल अंबुलकर यांच्या नेतृत्वाखाली पीएसआय अविनाश जायभाये, हेकॉं दिपक लेकुरवाळे, राजू टेकाळे, चांद शेख, गणेश पाटील, पोकॉं गजानन गोरले, रवी भिसे, राजू आडवे यांचा पथकाने केली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास जळगाव जामोद पोलिस करीत आहे.