spot_img

जिल्ह्यातील १८ पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या

चिखली पोलिस स्टेशनचे ठाणेदार संग्राम पाटील यांचा समावेश

बुलढाणा, ४ नोव्हेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) ः स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकांची घोषण आज निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद व्दारे केली आहे. त्यामध्येच आज बुलढाणा पोलिस अधीक्षक निलेश तांबे यांनी पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहे. पोलिस निरीक्षक आशिष साहेबराव रोही यांची नियंत्रण कक्ष बुलढाणा येथून आर्थिक गुन्हे शाखा बुलढाणा येथे बदली झाली आहे. नितिन कुमार पाटील ठाणेदार शहर शेगाव यांची बदली ठाणेदार जळगाव जमोद येथे झाली आहे. पोलिस निरीक्षक श्रीकांत निचळ ठाणेदार पोलिस स्टेशन जळगाव जामोद यांची बदली पासपोर्ट शाख बुलढाणा येथे झाली आहे. निमिष मेहत्रे ठाणेदार पोलिस स्टेशन लोणार यांची बदली ठाणेदार शेगाव येथे झाली आहे. प्रकाश सदगिर आर्थिक गुन्हे शाखा बुलढाणा यांचे बदली ठाणेदार लोणार पोलिस स्टेशन येथे झाली आहे. संग्रामसिंह पाटील ठाणेदार चिखली यांची बदली प्रभारी अधिकारी सायबर पोलिस स्टेशन येथे झाली. भ्ाुषण गावंडे पासपोर्ट शाख बुलढाणा यांची बदली ठाणेदार चिखली पोलिस स्टेशन येथे झाली आहे. चंद्रकांत पाटील ठाणेदार पोलिस स्टेशन सोनाळा यांची बदली ठाणेदार पिपंळगाव राजा पोलिस स्टेशन येथे झाली आहे. मुकेश गुजर ठाणेदार पोलिस स्टेशन पिपंळगव राजा यांची बदली वाचक उपविभागीय पोलिस अधिकारी मलकापूर येथे झाली आहे. संदीप काळे पोलिस स्टेशन मलकापूर ग्रामीण यंाची बदली ठाणेदार सोनाळा पोलिस स्टेशन येथे झाली आहे. भागवत मुळीक पोलिस स्टेशन खामगाव शहर यांची बदली ठाणेदार हिवरखेड पोलिस स्टेशन येथे झाली आहे. कैलास चौधरी ठाणेदार पोलिस स्टेशन हिवरखेड यांची बदली पोलिस स्टेशन नांदुरा येथे झाली आहे. हेमराज कोळी एमआयडीसी पोलिस स्टेशन मलकापूर यांची बदली दोषसिध्द विभाग अतिकार्यभार डायल ११२ येथे झाली आहे. नरेंद्र पेन्दोर पोलिस स्टेशन नांदुरा यांची बदली ठाणेदार एमआयडीसी पोलिस स्टेशन मलकापूर येथे झाली आहे. पोलिस उपनिरीक्षक दत्ता नरवाडे पोलिस स्टेशन देऊळगाव राजा यांची बदली पोलिस स्टेशन जलंब येथे झाली आहे. पोलिस उपनिरीक्षक क्रांती ढाकणे पोलिस स्टेशन नांदुरा यांची बदली पोलिस स्टेशन नांदुरा येथे झाली आहे. रंजन अवारे पोलिस स्टेशन शिवाजीनगर यांची बदली पोलिस स्टेशन नांदुरा येथे झाली आहे. कोमल शिंदे पोलिस स्टेशन देउळगाव राजा यांची बदली पोलिस स्टेशन शिवाजीनगर येंथे झाली आहे.

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत