spot_img

शेवटी पत्ते उघडले… आकाश दळवींनी या… पक्षाकडे दिली नगराध्यक्ष पदाची मुलाखत

बुलढाणा, ७ नोव्हेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) : आकाश दळवी आणि त्यांच्या पत्नी निलमताई दळवी यांनी भाजपची उमेदवारी मिळावी यासाठी मुलाखत दिली आहे. शिवसेनेतून राजीनामा दिल्यानंतर आकाश दळवी यांच्या राजकीय वाटचालीकडे बुलढाणेकरांचे लक्ष लागून होते. आकाश दळवी हे मागील निवडणुकीत कॉंग्रेस कडून लढले आणि नगरसेवक झाले होते. त्यांनंतर तब्बल चार वर्षांनी नगर पालिकेच्या निवडणूका होत आहे. आकाश दळवी हे स्वतः नगराध्यक्ष पदासाठी आग्रही होते. परंतु बुलढाण्याची जागा सर्वसाधारण महिलांसाठी सुटली आहे. त्यामुळे आकाश दळवी यांच्या पत्नी निलमताई दळवी यांना पुढे करत आज भाजपकडून लढण्यासाठी त्यांनी उमेदवारी मागितली आहे. आज गर्दे वाचनालय बुलढाणा येथे भाजपचे पक्ष निरीक्षक तथा मलकापूरचे आमदार चैनसुख संचेती हे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेत आहे. आकाश दळवी आणि त्यांच्या पत्नी निलमताई दळवी यांनी भाजपची उमेदवारी मिळावी यासाठी मुलाखती दिल्या आहेत.

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत