बुलढाणा, १५ नोव्हेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाचे नेते अतुल लोखंडे यांच्या पत्नी माजी पाणीपुरवठा सभापती बुलढाणा नगर परिषद कविता लोखंडे यांनी आज भाजप मध्ये प्रवेश केला आहे. नगर पालिका निवडणूकांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत १७ नोव्हेंबर रोजी संपणार आहे. त्या आधी काही राजकीय घडमोडींना वेग येत आहे. राजकीय पक्षांनी बंडखोरी टाळण्यासाठी उमदेवारी जाहीर करण्यास उशीर केला आहे. प्रत्येकाला शब्द दिला जात आहे पण अनेक वेळा काही प्रभागात चार पेक्षा जास्त उमेदवार उमेदवारी मागत असल्यामुळे सध्या वेट अँड वाच ची भुमिका राजकीय पक्षांनी घेतल्याचे दिसून येत आहे.
आज १५ नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते अतुल लोखंडे यांच्या पत्नी कविता लोखंडे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. कविता लोखंडे यापूर्वी बुलढाणा नगर परिषदच्या माजी पाणीपुरवठा सभापती राहिल्या आहे. आज त्यांनी भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे, बुलढाणा नगर परिषद प्रभारी विश्वनाथ माळी, महामंत्री दत्ता पाटील, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत बर्दे, भाजप शहराध्यक्ष मंदार बाहेकर, जिल्हा सचिव गणेश जाधव, भाजप नेते विश्राम पवार, वैभव जोशी, ऍड.सुरज सानप, सचिन सुर्यवंशी, विलास तायडे यांची उपस्थिती होती.



