बुलढाणा, 17 नोव्हेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) ः नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेना शिंदे गटाने नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराची घोषणा केली आहे. विद्यमान आमदार संजय गायकवाड यांच्या धर्मपत्नी सौ. पूजाताई संजय गायकवाड पुन्हा एकदा नगराध्यक्षपदाच्या निवडणूकीत उतरल्या आहेत. आज आ. संजय गायकवाड यांच्या समवेत जावून त्यांनी अर्ज दाखल केला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, नेते विजय अंभोरे तसेच अनेक समर्थक मोठ्या संख्येत उपस्थित होते. माजी नगराध्यक्षा पूजाताई गायकवाड यापूर्वी नगरसेवकांमधून नगराध्यक्ष म्हणून नियुक्त झाल्या होत्या. परंतु जनतेतून नगराध्यक्षपदाच्या निवडणूकीत त्या दोन वेळा पराभूत झालेल्या आहेत. दोन्ही वेळा फार थोड्या मतांनी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. यावेळेस जेव्हा त्या निवडणूक लढत आहे, तेव्हा अनेक गोष्टी त्यांना प्रबळ करणाऱ्या आहेत. स्वतः संजय गायकवाड आमदार आहेत. भाजपसोबत युती नसल्याचा काही तोटा त्यांना होतो का ? की, भाजप सोबत नसतांनाही त्या विजयाला गवसणी घालतात, हे पुढे कळेलच.



