spot_img

भाजप-मित्रपक्षाच्या बुलढाणा न.प. निवडणूकीसाठीच्या उमेदवारांची यादी पहा

बुलढाणा, 17 नोव्हेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) ः कुणी पाच वर्षांपासून किंवा कुणी महिनाभरापासून नगरसेवक पदासाठी तयारी करीत असेल. पण पक्षाकडून ज्याला एबी फॉर्म मिळतो तोच खऱ्या अर्थाने पक्षाचा उमेदवार ठरतो. ही बाब सर्वच पक्षांची आहे. नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी प्रमुख पक्षांकडून आपले सगळे पत्ते ओपन केले जातात. आज जेव्हा उमेदवारांच्या नामांकनाला एबी फॉर्म जोडले गेले तेव्हा अनेकांसाठी काही चेहरे धक्कादायक होते. तिकीट नाही मिळाले तर बंडखोरी करणारेही असतात. भाजपमध्ये बंडखोरीची शक्यता जवळपास शून्य असेल. याला कारण वरूनपासून खालपर्यंत भाजपची सत्ता असल्यामुळे बंडखोरी करणाऱ्यांना दहा नव्हे तर शंभर वेळा याचा विचार करावा लागेल. असो, आज काही नवीन चेहऱ्यांना भाजपकडून संधी मिळाली तर काही जुने चेहरे निवडणूकीतून गायब आहेत. गुड इव्हिनिंग सिटीला भाजपकडून प्राप्त झालेल्या यादीनुसार एकुण 15 प्रभागात 29 उमेदवार देण्यात आले आहे. प्रभाग क्र. 1 च्या ब गटामध्ये सर्वसाधारण महिलेच्या जागी भाजपचा उमेदवार नाही. याबाबत भाजप शहराध्यक्ष मंदार बाहेकर यांनी माहिती दिली की, ज्या उमेदवारांना नामांकनाचे सूचित करण्यात आले होते, त्यांच्याकडून फॉर्म चुकल्यामुळे गोंधळ झाला असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याठिकाणी समविचारी उमेदवाराला पुरस्कृत करण्याचा विचार भाजप करू शकते.
शिवसेना शिंदे गट सोडला तर भाजपसोबत राष्ट्रवादी अजीतदादा गट तसेच रिपाइं आठवले गट युती करून आहे. भाजप मित्रपक्षांच्या युतीचे उमेदवार पुढीलप्रमाणे आहेत.
प्रभाग क्र. 1 ः (अ) नितीन विमल बेंडवाल. (ब) निरंक ,
प्रभाग क्र. 2 ः (अ) सैय्यद आसिफ सै. यासिन (राष्ट्रवादी). (ब) नजमुन्नीसा बेगम मो. सज्जाद (राष्ट्रवादी).
प्रभाग क्र. 3 मध्ये राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता ः (अ) मेघा प्रदीप सोनटक्के. (अ) पुनम मुकेश रेड्डी (राष्ट्रवादी). (ब) स्फूर्तिदीप प्रल्हाद ठाकरे . (ब) मो. सज्जाद अब्दुल खालिक (राष्ट्रवादी).
प्रभाग क्र. 4 ः (अ) जावेद शेख शेख सलीम. (ब) शेख गोसेयाबी सत्तार (राष्ट्रवादी).
प्रभाग क्र. 5 ः (अ) सविता भगवान बेंडवाल. (ब) रविंद्र पांडुरंग होंडे.
प्रभाग क्र. 6 मध्ये राष्ट्रवादीसोबत मैत्रीपूर्ण लढतीची शक्यताः (अ) रत्नमाला दामोदर बोर्डे. (अ) रूक्मिणी शिंदे. (राष्ट्रवादी). (ब) अनिल दत्तात्रय बावस्कर (राष्ट्रवादी).
प्रभाग क्र. 7 ः (अ) रत्ना रमेश मोरे. (ब) संजय भानुदास मोटे.
प्रभाग क्र. 8 ः (अ) कविता अतुल लोखंडे. (ब) गणेश भगवान जाधव.
प्रभाग क्र. 9 ः (अ) आनंद सुदाम झोटे. (ब) आसमाँ याकूब शेख.
प्रभाग क्र. 10 ः (अ) दीपा वैभव जोशी. (ब) महेश दामोदर बिडवे.
प्रभाग क्र. 11 ः (अ) वैभव दिलीप इंगळे. (ब) मंजुषा सचिन टेंभीकर.
प्रभाग क्र. 12 ः (अ) आकाश विजय दळवी. (ब) रंजना राजेंद्र कायस्थ.
प्रभाग क्र. 13 ः (अ) लता भगवान पैठणकर. (ब) अशोक कचरू हिवाळे.
प्रभाग क्र. 14 ः (अ) सरला मंदार बाहेकर. (ब) सोहम पुरुषोत्तम झाल्टे.
प्रभाग क्र. 15 ः (अ) सुमिता राजेश निकम. (ब) पवनकुमार शशिकांत देशमुख.

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत