बुलढाणा, 18 नोव्हेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) : बुलढाणा नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी लक्ष्मी दत्ता काकस यांनी काल अर्ज दाखल केला आहे. त्यासोबत काही प्रभागात काँग्रेस मित्र पक्षासोबत निवडणूक लढणार आहे. त्यामध्ये काँग्रेसचे उमेदवार प्रभाग २ अ मो. वसिम शे. अनवर, ब तबसुम परविन शे. अनिस, प्रभाग ३ अ राणीबी शेख लाल, ब शेख नदीम शेख सलीम, प्रभाग ४अ जाकीर हुसेन शेख कादर कुरेशी, ब मुबरोशेरा आयेशा अताउल्लाह खान, प्रभाग ६ अ शिलाबाई तेजराव गवई, ब यमुनाबाई शंकर काकस, ७ अ रंजना राम मोरे, ब दत्ता शंकर काकस, प्रभाग ८ ब यशपालसिंह चंदनसिंह ठाकूर, प्रभाग ११ अ जयश्री अनिल वारे, ब आशा प्रदीप बेगाणी, प्रभाग १३ अ सुवर्णलता राजेंद्र दाभाडे, ब सतीश सुदाम मोरे यांचा समावेश आहे.



