spot_img

कुडकूडणाऱ्या थंडीत शहर पोलीस कर्मचारी बनले निराधारांसाठी “मायेचा आधार “

खामगांव २४ नोव्हेंबर ( गुड इव्हीनींग सिटी / दगडू तायडे): शहरातील सार्वजनिक ठिकाणी व फुटपाथवर झोपलेल्या निराधारांसाठी शहर पोलीस मायेचा आधार बनत आपल्या खाकी वर्दीतील माणुसकीचा परिचय दिला.
जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांची संकल्पना असलेल्या मिशन परीवर्तन अंतर्गत खामगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामकृष्ण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.
काही दिवसांपासून शहरात थंडीचा जोर वाढला असून रात्रीच्या वेळी अनेक ठिकाणी फूटपाथ व सार्वजनिक ठिकाणी अनेक असहाय व निराधार बांधव रात्रीच्या वेळेस थंडीत कुडकुडतांना दिसतात. अशावेळी अनेक सामाजिक कार्यकर्ते व संघटना त्यांच्या मदतीला धावून येत असतात मात्र यावेळी खामगाव शहरातील शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारी या गरीब निराधार गरजवंत बांधवांच्या मदतीसाठी धावून येत त्यांचा शोध खामगाव शहर पोलिसांनी एक सामुदायिक उपक्रम राबवला आहे.घेत रात्रीच्या वेळी त्यांचा थंडीपासून बचाव करण्यासाठी अंगावर ब्लॅंकेट चादरी स्वेटर आदींचे वाटप केले आहे. रात्रीच्या थंडीत गरजूंना ब्लॅंकेट पांघरून देत शहर पोलिसांनी त्यांना थंडीच्या काळात मायेची उब दिली त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर थंडीतही हास्य फुलले होते. शहरातील दानशूरांनी अशाच गरजवंतांच्या मदतीसाठी पुढे येण्याची गरज असल्याचे मत ठाणेदार रामकृष्ण पवार यांनी व्यक्त केले. यावेळी ठाणेदार पवार यांच्यासह शहर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी हा उपक्रम शहरात राबवला.

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत