बुलढाणा, २३ डिसेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) : सव येथे उद्या बुधवार २४ डिसेंबर रोजी इंदोरीकर यांच्या किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत “माझं गाव माझी मायभूम” या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामस्थांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात सुप्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. निरुपणकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर महाराज) यांचे प्रेरणादायी कीर्तन संपन्न होणार आहे. कीर्तनातून ग्रामविकास, स्वच्छता, सामाजिक ऐक्य, आणि ग्रामपंचायतीच्या सशक्तीकरणाबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
हा कार्यक्रम २४ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत आयोजित करण्यात आला असून, जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात, ग्रामपंचायत सव, पंचायत समिती बुलढाणा येथे कार्यक्रम पार पडणार आहे.
या कार्यक्रमास ग्रामस्थांनी उपस्थित राहून लाभघ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.