बुलढाणा, 2 जानेवारी (गुड इव्हिनिंग सिटी) : अनेक पिढ्यांच्या उद्धारकर्त्या व शिक्षणाची जगन्माता सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने शनिवार, ३ जानेवारी २०२६ रोजी विशेष व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात प्रसिद्ध व्याख्यात्या राजश्रीताई सचिन गायकवाड यांचे व्याख्यान होणार आहे.
हा कार्यक्रम शनिवार, ३ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १२.३० वाजता पत्रकार भवन, बुलढाणा येथे संपन्न होणार आहे. कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ. अभिलाष माळी (वैद्यकीय सर्जन) तसेच देवांगणाताई अमित ठाकरे (नगरसेविका, नगर परिषद बुलढाणा) उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार सुरेखाताई सोमनाथ सावळे असतील. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी पत्रकार परिषदेचे प्रदेश प्रतिनिधी गणेश निकम तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवराज वाघ करणार आहेत.
सावित्रीमाई फुले यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरव करणाऱ्या या कार्यक्रमास नागरिकांनी, पत्रकार बांधवांनी व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे.



