बुलढाणा, 4 जानेवारी (गुड इव्हिनिंग सिटी) : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड एग्रीकल्चर च्या महाराष्ट्र प्रदेश कमिटीवर निमंत्रित सदस्य म्हणून जितेंद्र एन जैन यांची निवड झालेली आहे. वर्धमान अर्बनचे संस्थापक अध्यक्ष, अरिहंत मल्टीस्टेटचे संस्थापक अध्यक्ष आणि सध्या शिखरजी मल्टीस्टेट ऍग्रो प्रोसेसिंग अँड मार्केटिंग को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड बुलढाणा चे चेअरमन म्हणून कार्यरत असलेले जितेंद्र एन जैन आपल्या बुलढाणा शहराचे रहिवासी यांना या पदावर नेमणूक मिळाली. हा त्यांचा फार मोठा सन्मान आहे आपल्या बुलढाणा वासियांसाठी. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड एग्रीकल्चर (मासिया) चे अध्यक्ष रवींद्र मानगावे यांनी जितेंद्र एन जैन यांची निवड केली. येणाऱ्या काळात बुलढाणा जिल्हा तसेच संपूर्ण विदर्भामध्ये मासिया महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड एग्रीकल्चर (MACCIA) चा प्रचार आणि प्रसार आणि संघटनात्मक बांधणी करण्याचे सुतोवाच नवनियुक्त निमंत्रित सदस्य जितेंद्र एन जैन यांनी जाहीर केले. गाव तेथे उद्योजक ही नवीन संकल्पना या फेडरेशनच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात एक नवीन चळवळ सुरू केलेली आहे. लवकरच ही चळवळ आपल्या बुलढाणा जिल्ह्यात आणि संपूर्ण विदर्भात खूप फोफावेल, अशी आशा जितेंद्र एन जैन यांनी व्यक्त केली. या निवडीसाठी त्यांनी फेडरेशनचे अध्यक्ष रवींद्रजी माणगावे यांचे आभार मानले आणि निश्चितपणे येणाऱ्या काळात या फेडरेशनचे काम जिल्ह्यातल्या आणि विदर्भातल्या प्रत्येक गाव खेड्यात पोहोचू असा ठाम निर्धार त्यांनी यावेळी केला.



