spot_img

धाड येथे भीषण अपघात; एसटी बस व दुचाकीच्या धडकेत तिघांचा जागीच मृत्यू

बुलढाणा, 5 जानेवारी ( गुड इव्हिनिंग सिटी) : येथे आज रविवार, ५ जानेवारी रोजी सायंकाळी सुमारे ४.५० वाजताच्या सुमारास भीषण रस्ते अपघात झाला. छत्रपती संभाजीनगरहून मलकापूरकडे जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बस आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत तिघा दुचाकीस्वारांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

मलकापूर आगाराची एमएच-०६ बीडब्ल्यू-३६३८ क्रमांकाची एसटी बस करडी (धाड) येथील पुलावर आली असता, धाडकडून करडीच्या दिशेने जाणारी दुचाकी बसला समोरून धडकली. धडकेचा जोर इतका प्रचंड होता की दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला व ती बसखाली अडकली.

या अपघातात ढालसावंगी (ता. बुलढाणा) येथील अंकुश पाडळे, रवी चंदनशे आणि कैलास शिंदे या तिघांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे ढालसावंगी गावावर शोककळा पसरली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास धाड पोलिस करीत आहेत.

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत