बुलढाणा, 8 जानेवारी (गुड इव्हिनिंग सिटी) : डॉ.राजेंद्र गोडे वैद्यकीय महाविद्यालय अमरावती या वैद्यकीय महाविद्यालयास पदव्युत्तर पदवीच्या शिक्षणास मान्यता मिळाली आहे. 23 डिसेंबर 2025 रोजी राष्ट्रीय वैद्यकीय समितीकडे प्राप्त प्रस्तावानुसार 7 जानेवारी रोजी राष्ट्रीय वैद्यकीय समितीचे सचिव डॉ.राघव लंगेर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे. विदर्भातील महत्त्वाचे असलेले डॉ.राजेंद्र गोडे महाविद्यालयास 9 वैद्यकीय विषयांच्या पदव्युत्तर पदवीच्या शिक्षणास मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये MS-Obstetrics & Gynecology साठी 4 जागा, MD-DVL साठी 2 जागा, MS-Otorhinolaryng ology (ENT) साठी 2 जागा, MS-Ophthalmology साठी 2 जागा, MD-Radio Diagnosis साठी 4 जागा, MD-Orthopaedics साठी 2 जागा, MS-General Surgery साठी 2 जागा, MD-General Medicine साठी 4 जागा, MD-Anaesthesiology साठी 4 जागा, MD-Paediatrics साठी 4 जागांची मान्यता मिळाली आहे.
डॉ.राजेंद्र गोडे महाविद्यालयाचे अध्यक्ष योगेंद्र गोडे यांच्या माध्यमातून वैद्यकीय महाविद्यालयास नविन आयाम प्राप्त होत आहे. वैद्यकीय महाविद्यालयास पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाबद्दल डॉ राजेंद्र गोडे वैद्यकीय महाविद्यालयाचे अध्यक्ष, सचिव, संचालक मंडळ, प्राचार्य व प्राध्यापक वर्गाचे सर्वत्र कौतुक होत आहे.