बुलढाणा, 15 जानेवारी (गुड इव्हिनिंग सिटी) : सर्वच ठिकाणी बेरोजगारीने आकाश पातळी गाठलेली आहे. तरूण हाताला रोजगार आणि काम नसल्यामुळे सामाजिक अभिसरणाच्या प्रक्रियेला खिळ बसत आहे. हे ओळखून माँ जिजाऊ चॅरिटेबल फाउंडेशनकडून शिरपूरमध्ये रविवार, 18 जानेवारी 2026 रोजी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 3200 विविध पदांसाठी विविध कंपन्यांकडून भरती केली जाणार असून या मेळाव्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते होणार आहे. तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात तसेच नगर परिषद बुलढाणाचे गटनेता मृत्यूंजय गायकवाड आणि जिल्हा कौशल्य विभागचे सहाय्यक आयुक्त गणेश बिटोडे उपस्थित राहतील. याशिवाय शिरपूर सरपंच सौ. लक्ष्मीबाई सुसर, साखळीच्या सरपंच सौ. सुनिताताई भगत, येळगांव सरपंच दादाराव लवकर, साखळी खुर्द सरपंच पंडीत हिवाळे, अजीसपुर सरपंच सौ. संध्याताई जगताप इत्यादी मान्यवर मेळाव्यात प्रामुख्याने उपस्थित असतील. सदर मेळावा अनेक बेरोजगार युवक-युवतींच्या आयुष्याला नवी दिशा देणारा आणि जीवनाला आर्थिकदृष्ट्या स्थिर करणारा ठरू शकतो, म्हणून मोठ्या संख्येने या भव्य रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन माँ जिजाऊ चॅरिटेबल फाऊंडेशनचे अध्यक्ष शिवाजी तायडे आणि सचिव सौ. सरला शिवाजी तायडे यांनी केले आहे.



