मागील वर्षीच्या तुलनेत वन्यजीवांच्या संख्येत वाढ

बुलढाणा, २५ मे (गुड इव्हिनिंग सिटी) : ज्ञानगंगा अभयारण्यात बुद्धपौर्णिमेला करण्यात आलेल्या गणणेत २० बिबट, ३३ अस्वल आढळले निसर्ग अनुभव करताना ज्ञानगंगा अभयारण्यातील बुलढाणा आणि खामगाव या दोन वनपरिक्षेत्रात ६०३ वन्यप्राणी आढळून आले आहेत. ज्ञानगंगा अभयारण्यात दरवर्षी बुद्ध पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या लख्ख प्रकाशात वन्यजीवांचे नोंद करण्यात येत असते. वन्यप्रेमींना निसर्ग अनुभव कार्यक्रमात सहभाग घेता येतो. यावर्षी ज्ञानगंगा अभयारण्यात १४ मचाणावर बसून निसर्गप्रेमींना प्राणी गणनेचा आनंद घेता आला. यावेळी एका निसर्गप्रेमींसोबत वन्यजीव विभागाचा एक कर्मचारी सोबत होता. वन्यजीवपासूनच्या हालचालींवर लक्ष ठेवून प्राण्यांची नोंद करण्यात आली त्यामध्ये बिबट, अस्वल, रानडुक्कर, सायाळसह इतर वन्यप्राणी आढळून आले. निसर्ग अनुभव कार्यक्रमात कार्यक्रम राबविण्यासाठी सहाय्यक वनसंरक्षक चेतन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली आरएफओ दीपेश लोखंडे, आरएफओ विशेष सेवा पी. बी. पाटील व वन्यजीव विभागाचे कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. तसेच काही प्राणी प्रेमींनी सुध्दा हजेरी लावली होती. अंबाबारवा अभयारण्यातील व्याग्र शिवारातील २ दोन वाघांसह ३३१ वन्यप्राण्यांची नोंद घेतली. मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत येत असलेल्या सोनाळा वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत अंबाबरवा अभयारण्यात बुद्धपौर्णिमेच्या दिवशी निसर्ग अनुभव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांतर्गत चंद्राच्या लखलखीत प्रकाशात वन्य प्राण्यांची गणना करण्यात आली. यावेळी अंबाबारवा अभयारण्यात एकूण ५ वर्तुळ असून ११ बीटच्या माध्यमातून प्राणी गणना झाली आहे. यामध्ये ३३१ विविध प्रकारच्या वन्य प्राण्यांनी दर्शन दिले. दरम्यान १९ वनरक्षक, ४९ वनमजूर, ५ वनपाल, ५ विशेष व्याघ्रदलाचे जवान कर्तव्यावर होते. यामध्ये चिखलदरा ट्रेनींग सेंटर येथील १५ वनरक्षकानी निसर्ग अनुभव कायक्रमाध्ये सहभाग घेतला. सदरचा निसर्ग अनुभव कार्यक्रम हा उपवनसंरक्षक एन. जयकुमारन व्या.प्र.मे. अकोट यांचे मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले. यावर्षी अभयारण्यात निसर्ग अनुभव कार्यक्रमामध्ये प्रवेश मिळाल्याने वन्यजीव प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. ३१ मचाणव्दारे प्राण्यांचे निरीक्षण यावर्षी ३१ पाणवठ्यावर उभारलेल्या ३१ मचाणव्दारे प्राण्यांचे निरीक्षण करून नोंदी करण्यात आल्या. यावेळी करण्यात आलेल्या नोंदीनुसार, वाघ २, अस्वल १०, नील गाय २६, सांबर २९, भेडकी ११, गवा १२, रान डुक्कर ३७, लंगूर १, माकड १११, म्हसण्या उद २, रान कोंबडी ५, मोर ७४, ससा ४, रान कुत्रा २, मुगुस १, चौसिंगा ४, असे एकूण ३३१ प्राण्यांनी दर्शन दिले. प्राणी गणनेसाठी अभयारण्यात ७ नैसर्गिक, २४ कृत्रिम, असे एकूण ३१ पाणवठ्यावर ३१ मचाण उभारण्यात आले होते,