spot_img

“सतीश पवारांच्या आरोपावर भडकली वंचित” पवार यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी

बुलढाणा, 9 मे (गुड इव्हिनिंग सिटी) : वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी आणि पक्षा विरुद्ध खोटे आरोप केल्या प्रकरणी सतीश पवार यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी वंचीत बहुजन आघाडीचे वतीने करण्यात आली आहे. सतीश पवार यांनी 6 मे रोजी फेसबुक लाईव्ह करत राजीनामा दिल्याची माहिती देत असातांना त्यांनी वंचीत बहुजन आघाडीतील वरिष्ठ पदाधिकार्‍यांवर गंभीर आरोप केेले होते. याची दखल घेत वंचीत बहुजन अघाडीच्या वतीने सतीश पवार यांच्याविरोधात पदाधिकार्‍यांची बदनामी केल्याप्रकारणी गुन्हा दाखल करण्याची मागणी बुलढाणा शहर पोलिस स्टेशनला एका निवेदनाव्दारे करण्यात आली आहे. सदर निवेदनामध्ये त्यांनी म्हटले आहे की, वंचित बहुजन युवा आघाडीचे बुलढाणा माजी जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांनी आपला जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याची माहिती फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून देताना पक्षावर उमेदवारी साठी सेटिंग करण्यात येत असल्याचा आरोप केला आहे. तसेच पक्षातील वरिष्ठ पदाधिकार्‍यांवर अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप देखील केले आहेत. वरिष्ठ पदाधिकार्‍यांकडून प्रकाश आंबेडकर यांच्यापर्यंत चुकीची माहिती पोहोचवली जात आहे, सेटलमेंट करून पदाधिकार्‍यांना डावलल जात आहे, त्यांना लाचार केल जात आहे, ज्या उमेदवाराची केवळ आणि केवळ पराभवाची पार्श्वभूमी आहे त्यांना दलाली करून उमेदवारी दिली जात आहे, यासह अनेक गंभीर आरोप सतीश पवार यांनी केले आहेत. पक्ष सेटलमेंट करतो आणि उमेदवारी देतो असा थेट आरोप केला आहे. मात्र तसा कुठलाही पुरावा त्याने दिला नाही. पक्षा विरुद्ध आणि उमेदवारी मिळविण्यासाठी तो करीत असलेली कृती आणि पक्ष नेतृत्वाकडून दिलेल्या उमेदवाराला सहकार्य केले नसल्याने वंचित बहुजन युवा आघाडीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ.निलेश विश्वकर्मा ह्यांनी शनिवार दिनांक 4 मे रोजी त्यास कारणे दाखवा नोटीस बजावली होती. तसेच खुलासा मागून हकालपट्टी का करण्यात येऊ नये अशी विचारणा त्यांनी एका पत्राव्दारे सतीश पवार यांच्याकडे केली होती. पण त्यांनी त्यास उत्तर देण्याऐवजी आरोप करत पक्षाच्या वंचीत बहुजन युवा आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. असे सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या निवेदनावर वंचीत बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष निलेश जाधव, देवा हिवराळे व अन्य पदाधिकार्‍यांच्या सह्या आहेत. पोलिस या तक्रारीवर काय कार्यवाही करतात हे येणार्‍या कालावधीत समोर येईल.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत