■ नुकसान होऊन महिना झाला तरी शेतकरी मदतीपासून वंचीत
बुलढाणा, १९ ऑक्टोबर (गुड इव्हिनिंग सिटी): जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीनच्या पिकांना याचा मोठा फटका बसला असून, अनेक ठिकाणी पिके अक्षरशः मातीमोल झाली आहेत. परिणामी शेतकरी हतबल झाले असून, उभ्या पिकाचे नुकसान झाल्यामुळे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. त्याबरोबरच परतीचा पाऊस अचानक पडत असल्यामुळे वेचणीस आलेल्या कापसाचे ही अत- ोनात नुकसान होत आहे. अति पावसामुळे सोयाबीनची माती झाली आहे. काढणी केलेली सोयाबीन उन्हात वाळत घालावी लागते तर पावसाच्या भीतीने झाकून ठेवण्यासाठी ताडपत्री खरेदी करावी लागते. एवढे सगळे करूनही भाव मात्र जास्तीत जास्त ४ हजार २०० रुपये. दु- सरीकडे पावसामुळे कापसाच्याही वेचणी अभावी वाती होत आहेत. सोयाबीन काढणी व कापूस वेचणी सोबतच आल्यामुळे मजुराचीही टंचाई भासत आहे. या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. सोयाबीन व कापसाचे पीक सर्वाधिक प्रभावित झाले असून, अनेक भागात पिकांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टी, ढगफुटी व परिस्थितीमुळे सोयाबीन, कापूस, तूर, मूग व उडीद या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. नुकसाग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरिपाच्या पीक विमाधारक शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम विमा रक्कम देणे आवश्यक असतांना सुध्दा दिले नाही. सद्य स्थितीत मुसळधार पावसामुळे सोयाबीन मोठ्या प्रमाणात ओली असल्यामुळे काढणी करतानाही शेतकऱ्यांचे नाकीनऊ येत आहेत. सोयाबीन काढणी झाल्यानंतर वाळत घालावी लागते. याताच ढगाळ वातावरण तयार होऊन पाऊसही पडतो. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडत आहे. सद्यस्थितीत सोयाबीनला ३ हजार ८०० ते ४ हजार २०० रूपये प्रती विंटल दर मिळत आहे तर दुसरीकडे सोयाबीन व कापूस वेचणी सोबतच आल्यामुळे मजुरांची प्रचड टंचाई भासत असून अधून मधून पाऊस पडत असल्यामुळे कापसाच्या झाडालाच वाती होत असताना दिसून येत आहेत. शासनाकडून कुठलेच पंचनामे झाले नाही. पीक विम्याच्या तक्रारी केल्यानंतर ही विमा कंपनीचे प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या बांधावर पंचानामा करण्यासाठी गेले नाही. आता अचारसंहितेची कामे असल्याचे सांगून मदत वाटप केल्या जात नाही.