बुलढाणा विधानसभेसाठी 21 जणांनाी दाखल केली उमेदवारीबघा कोणी कोणी केले उमेवारी अर्ज दाखल
बुलढाणा, 30 ऑक्टोबर (गुड इव्हिनिंग सिटी) :- बुलढाणा विधानसभा मतदार संघात उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी 29 ऑक्टोबरपर्यंत 21 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे. 23 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबराचा कालावधी बुलढाणा विधानसभा मतदारसंघासाठी अर्ज भरण्यासाठी दिला होता. या कालावधीत विविध पक्षांच्या व काही अपक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
या उमेदवारांमध्ये संजय गायकवाड, जयश्री सुनिल शेळके, विजयराज शिंदे, स्वाती विष्णू कंकाळ, अरूण संतोष सुसर, प्रमोद पुजाजी कलस्कर,मोहम्मद गुरफान दिवान, भाई विकास नांदवे, सतिशचंद्र रोठे, विजय रामकृष्ण काळे, प्रा.सदानंद माळी, मोहम्मद अन्सर मोहम्मद अल्ताफ, डॉ.मोबीन खान, जयश्री रविंद्र शेळके, निलेश अशोक हिवाळे, प्रशांत वाघोदे , जितेंद्र जैन, प्रा.रतन आत्माराम कदम, प्रेमलता सोनुने, सतिश पवार, अरिफ खान बिबन खान इत्यादी उमेदवारांचा यामध्ये समावेश आहे.