■ जिल्ह्यात २ हजार २८८ मतदान केंद्र, २१ लाख ३४ हजार मतदार
बुलढाणा, ६ नोव्हेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणेची सज्जता असून मतदारांनी निर्भयपणे आपल्या मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हा निवडणुक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील व निवडणूक निरिक्षक सामान्य स्मिता सभरवाल, नरेश झा, सिमा सरकार व पोलीस निवडणूक निरिक्षक गुरमीतसिंग चौहान यांनी आज पत्रकार परिषदेत केले. जिल्ह्यातील ७ विधानसभा मतदारसंघातील २ हजार २८८ मतदान केंद्रांवर २० नोव्हेंबरला मतदान होणार असून सुमारे २१ लाख ३४ हजार ५०० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जिल्हा प्रशासनाचे लक्ष्य मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी असून यासाठी मतदारांनीही प्रशासनाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत अधिकाधिक संख्येने मतदान करावे. तसेच भारत निवडणूक आयोगाने मतदारांच्या सुविधेसाठी विविध मोबाईल प सुरु केलेल आहेत. इनकोअर, सुविधाप, सक्षम प, केवायसी प, सिव्हीजील, व्होटर टर्नआऊट पचा समावेश आहे. वरील सर्व प मतदारांच्या सुविधेसाठी असून पारदर्शक व भितीमुक्त निवडणूक पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. तसेच निवडणूक संदर्भातील तक्रारीसाठी निवडणूक निरिक्षक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी व निवडणूक निरिक्षक यांनी केले. यावेळी पोलीस अधिक्षक विश्व पानसरे, अपर जिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुहासिनी गोणेवार आदी उपस्थित होते. जिल्ह्यात २१ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार दि. ३० ऑक्टोंबर २०२४ रोजीच्या अंतिम मतदार यादीनुसार जिल्ह्यातील मतदारांची संख्या २१ लक्ष ३४ हजार ५०० असून यामध्ये पुरुष मतदार ११ लक्ष ९ हजार ७९१, महिला मतदार १० लक्ष २४ हजार ६७१ तर तृतीयपंथी मतदार ३८ आहे. विधानसभा मतदार संघनिहाय मतदारांची संख्या याप्रमाणे : २१- मलकापूर विधानसभा मतदार संघात पुरुष मतदार १ लक्ष ५० हजार ५६, महिला मतदार १ लक्ष ३८ हजार ३२६ तर तृतीयपंथी ६ असे एकूण २ लक्ष ८८ हजार ३८५ मतदार आहेत. २२- बुलढाणा विधानसभा मतदार संघात पुरुष मतदार १ लक्ष ५९ हजार ४५२, महिला मतदार १ लक्ष ४७ हजार ६३८ तर तृतीयपंथी १६ असे एकूण ३ लक्ष ७ हजार १०६ मतदार आहेत. २३- चिखली विधानसभा मतदार संघात पुरुष मतदार १ लक्ष ५७ हजार १७०, महिला मतदार १ लक्ष ४८ हजार ५४६ तर तृतीयपंथी २ असे एकूण ३ लक्ष ५ हजार ७१८ मतदार आहेत. २४-सिंदखेड राजा विधानसभा मतदार संघात पुरुष मतदार १ लक्ष ६८ हजार ६०१, महिला मतदार १ लक्ष ५४ हजार ३९३ तर तृतीयपंथी १ असे एकूण ३ लक्ष २२ हजार ९९५ मतदार आहेत. २५-मेहकर विधानसभा मतदार संघात पुरुष मतदार १ लक्ष ५९ हजार ३७८, महिला मतदार १ लक्ष ४६ हजार ५७८ तर तृतीयपंथी ४ असे एकूण ३ लक्ष ५ हजार ९६० मतदार आहेत. २६- खामगांव विधानसभा मतदार संघात पुरुष मतदार १ लक्ष ५५ हजार ६३२, महिला मतदार १ लक्ष ४२ हजार २८५ तर तृतीयपंथी ५ असे एकूण २ लक्ष ९७ हजार ९२२ मतदार आहेत. तर २७-जळगाव जामोद विधानसभा मतदार संघात पुरुष मतदार १ लक्ष ५९ हजार ५०५, महिला मतदार १ लक्ष ४६ हजार ९०५ तर तृतीयपंथी ४ असे एकूण ३ लक्ष ६ हजार ४१४ मतदार आहेत. जिल्ह्यात २ हजार २२८ मतदान केंद्र :जिल्हयात लोकसभेसाठी २२६५ मतदान केंद्र होती. यात २३ नविन मतदान केंद्रांची वाढ होऊन विधानसभा निवडणूक २०२४ साठी जिल्ह्यामध्ये २२८८ मतदान केंद्र आहे. यामध्ये मलकापूर येथे ३०५, बुलढाणा येथे ३३७, चिखली ३१७, सिंदखेड राजा ३४०, मेहकर ३५०, खामगांव ३२२ तर जळगाव जामोद येथे ३१७ असे एकूण २ हजार २२८ मतदान केंद्र आहे. एकूण मतदान केंद्राच्या ५० टक्के मतदान केंद्रावर वेब कॉस्टींग केल्या जाणार असल्याची माहिती यावेळी दिली. जिल्ह्यात ११५ उमेदवारांमध्ये लढत तर ७२ उमेदवारांची माघार : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२० अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील सातही मतदारसंघात नामनिर्देशन अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी ७२ उमेदव- ारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता ११५ उमेदवारांमध्ये निवडणूकीची लढत होणार आहे. मलकापूर येथे १५, बुलढाणा येथे १३, चिखली येथे २४, सिंदखेड राजा येथे १७, मेहकर येथे १९, खामगांव येथे १८ व जळगांव जामोद येथे ९ असे एकूण ११५ उमेदव- ारांमध्ये लढत होणार आहे. तसेच नामनिर्दिष्ट उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले, ते याप्रमाणे : मलकापूर येथे ७, बुलढाणा येथे ८, चिखली येथे १८, सिंदखेड राजा येथे १८, मेहकर येथे ११, खामगांव येथे ४ व जळगांव जामोद येथे ६ असे एकूण ७२ उमेदवारांचे नामनिर्देशन उमेदवारी मागे घेतले आहेत. सोशल मीडियावर राहणार विशेष लक्ष : सोशल मीडिया, फेक न्यूजवर विशेष लक्ष देण्यात येणार आहे. मतदानाच्या काळात सोशल मीडियावर प्रसारित होणारे, गैरसमज पसरविणारे संदेश व इतर घटनांवर लक्ष ठेवून अशा घटनांचे त्वरीत खंडन करण्याची व कारवाई करण्याची खबरदारी घेणार असल्याचे सांगितले. मतदारांनो, व्होटर हेल्पलाईन पवर नाव शोधा : व्होटर हेल्पलाईन पवर मतदारांना आपले नाव शोधता येणार आहे. या पच्या माध्यमातून मतदारांनी मतदानासाठी आपले नाव शोधून मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले. ओळखीसाठी १२ पुरावे ग्राह्य : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीकरीता मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार फोटो ओळख पत्राव्यतिरिक्त इतर १२ प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य धरले आहेत. यापैकी कोणताही एक ओळख पुरावा दाखविल्यानंतर संबंधितांना मतदान करता येणार आहे. आधारकार्ड, मनरेगा जॉब कार्ड, बँक किंवा पोस्ट ऑफिसने जारी केलेले छायाचित्र असलेले पासबुक, कामगार मंत्रालयाच्या योजनेंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया यांचेद्वारा नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अंतर्गत निर्गमित स्मार्ट कार्ड, भारतीय पासपोर्ट, छायाचित्रासह पेन्शन दस्तऐवज, केंद्र/राज्य सरकार / सार्वजनिक उपक्रम / पब्लिक लिमिटेड कंपन्या यांनी कर्मचाऱ्यांना जारी केलेले सेवा ओळ- खपत्र, खासदार / आमदारांना जारी करण्यात आ- लेले अधिकृत ओळखपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाने जारी केलेले विशेष विकलांगता प्रमाणपत्र असे एकुण १२ कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहेत. दिव्यांग व वयोवृद्धासाठी गृहमतदान : दिव्यांग व ८५ पेक्षा जास्त वयोमानातील मतदारांन निवडणूकीमध्ये मतदान करता यावे यासाठी भारत निवडणूक आयोगाने होम वोटींगची सुविधा देण्यात आली आहे. त्यानुसार ३ हजार १०७ जेष्ठ नागरिक, ६७४ दिव्यांग असे एकूण ३ हजार ७८१ जेष्ठ ना- गरीक व दिव्यांगाचे घरपोच मतदान करणे सोईचे होण्यासाठी १६० पथकामार्फत दि. १४, १५ व १६ नोव्हेंबर २०२४ दरम्यान गृह मतदान करुन घेतले जाणार आहे. भारत निवडणूक आयोगाने मतदारांच्या सुविधेसाठी इनकोअर, सुविधाप, सक्षम प, केवायसी प, सिव्हीजील, व्होटर टर्नआऊट प उपलब्ध करुन दिले आहे. हे सर्व प मतदारांच्या सुविधेसाठी असून पारदर्शक निवडणूक पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.