बुलढाणा, १४ नोव्हेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) : दारू पिलेल्या चालकाविरुध्द डेपो मॅनेजरच्या तक्रारीवरून चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मद्यपान केलेल्या चालकास मध्यधुंद अवस्थेत पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आल्याची घटना 13 नोव्हेंबर रोजी घडली. बुलढाणा बसस्थानकावर पैठण आगाराचे वाहन क्रमांक एम एच 40 एन 97 75 चे चालक विलास देशमुख हे बसस्थानकावर दारू पिऊन असल्याची माहिती मिळाल्यानंतर आगर व्यवस्थापक अमोल गडलिंग यांनी चालकास गाडीच्या खाली उतरून सुरक्षा व दक्षता अधिकारी कांडलकर यांना सोबत घेत चालक विलास देशमुख याची अल्कोहोल मशीन द्वारे तपासणी केली. त्यामध्ये तो दारू पिल्याचे समजल्यानंतर तात्काळ चालकास बुलढाणा शहर पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आले. बुलढाणा शहर पोलिस स्टेशनमध्ये याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यापुढे कुठलाही चालक दारू पिऊन दिसल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आगार व्यवस्थापक अमोल गडलिंग यांनी दिली आहे. चालक आणि वाहकांनी याबाबत खबरदारी घेतली नाही तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा ही त्यांनी दिला आहे.
ReplyForwardAdd reaction |